नवी दिल्लीः OnePlus 11R 5G Launched: वनप्लस 11R 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. आज दिल्लीत झालेल्या वनप्लसच्या Cloud 11 इव्हेंट मध्ये या फोनला लाँच करण्यात आले आहे. या इव्हेंट मध्ये कंपनीने फ्लॅगशीप OnePlus 11 5G स्मार्टफोन, OnePlus Pad सह अनेक प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. OnePlus 11R 5G हँडसेट फ्लॅगशीप वनप्लसच्या वनप्लस 11 5जीच्या तुलनेत जास्त स्वस्त आहे. या फोनच्या बेस व्हेरियंटची किंमत फक्त ३९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. OnePlus चा नवीन मिड रेंज फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 5G चिपसेट दिले आहे. स्मार्टफोनमध्ये अलर्ट स्लाइडर आणि ६.७४ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड डिस्प्ले सारखे खास फीचर्स दिले आहेत.
OnePlus 11R 5G features
वनप्लस 11R स्मार्टफोनमध्ये ६.७४ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड एज-टू-एज डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन 120 हर्ट्ज़ पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट करते. स्क्रीनचा पिक्सल डेनसिटी 450 पीपीआय आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्र्रॅगन 8+ Gen 2 5G प्रोसेसर दिला आहे. हँडसेटमध्ये १६ जीबी पर्यंत रॅम दिला आहे. फोनमध्ये २५६ जीबी प्लस ५१२ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज ऑप्शन दिले आहे. वनप्लस 11R 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो ५० मेगापिक्सलचा सोनी IMX890 प्रायमरी रियर सेन्सर सोबत येतो. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे.

वाचाः OnePlus Pad : वनप्लसने लाँच केला 9510mAh बॅटरीचा पहिला टॅबलेट
वनप्लसचा नवीन फोन ऑप्टिकल झूम सपोर्ट करीत नाही. परंतु, 10x डिजिटल झूम या फोनमध्ये दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कॅमेराने 30fps वर 4K क्वॉलिटीचे व्हिडिओ रेकॉर्ड करता येवू शकते. कॅमेरा EIS (इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइज़ेशन) आणि OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइज़ेशन) सपोर्ट सोबत येतो. OnePlus 11R 5G ला पॉवर देण्यासाठी 100W फ्लॅश फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 5000mAh ची बॅटरी दिली आहे.
वाचाः OnePlus 11 5G : वनप्लस 11 5G ची भारतात जोरदार एन्ट्री, पाहा किंमत-फीचर्स