आदित्य ठाकरे भाषणाला उभे राहताच त्यांनी स्टेजवर भाषण न करता खाली उतरून भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच आदित्य यांनी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही डीजे वाजवून जयंती साजरी करा, असं देखील म्हटले. मेळावा संपल्यानंतर जयंती साजरी करत असलेल्या लोकांनी आदित्य ठाकरे आणि दानवे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आदित्य ठाकरे यांची गाडी सुरक्षा रक्षकांनी व्यवस्थित बाहेर काढली.
जय शहा यांनी थोपवले पाकिस्तानचे आक्रमण, आशिया स्पर्धेच्या बैठकीत नेमकं काय झालं जाणून घ्या
आदित्य ठाकरेंची सुरक्षा वाढवा: अंबादास दानवे यांची मागणी
आदित्य टाकरेंची संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा सुरु आहे. सातव्या टप्प्यात वैजापूर तालुक्यातील एका गावात सभा सुरु असताना दगड फेकण्यात आले. सभा स्थळावरुन ठिकाणावरुन निघताना काही जणांनी दगडफेक केली. वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या नावाच्या घोषणा दिल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. महाराष्ट्रातील सरकार आताचं जे सरकार आहे ते समाजासमाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कसूर झालेली आहे. स्थानिक पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असल्याचं अंबादास दानवे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेवरुन अंबादास दानवे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
सोयाबीनसह तुरीच्या दरवाढीचा ट्रेंड, बाजार समितीतून चांगले संकेत, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असल्यानं कारस्थान : अबादास दानवे यांचा आरोप
आदित्य ठाकरे त्यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. राज्यात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे त्यामुळे काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये म्हणून हे कारस्थान करण्यात आलं. दलित समाज आणि हिंदू समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये LIC चे मोठे नुकसान झाले का? ; सरकारने केला मोठा खुलासा