सलमान खाननं सांगितलं की, ‘मोठ्या पडद्यावर मी आणि शाहरुख एकत्र दिसण्यासाठी एका खास सिनेमाची गरज होती. मला हे सांगायला आनंद होत आहे की, हा सिनेमा पठाण होता. जेव्हा आम्ही करण अर्जुन सिनेमा केला. तेव्हा तो प्रचंड यशस्वी ठरला. आता पठाण हा सिनेमा देखील यशराज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्सचा हिस्सा आहे. हा सिनेमादेखील प्रचंड यशस्वी ठरला. आम्हा दोघांना एकत्र सिनेमात पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. आम्ही एकत्र काम करणं त्यांना आवडतं. त्यामुळे त्यांनी पठाण सिनेमावर भरभरून प्रेम केलं. जेव्हा आदीनं मला सीक्वेंस ऐकवला आणि आम्हा दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र आणण्याचा विचार मांडला तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला.’
हे वाचा-विशाखाची लाखमोलाची साडी; ज्या व्यक्तीने दिली भेट त्यांना भेटायचं राहून गेल्याची खंत
‘पठाण’नं विक्रम रचल्यानं सलमान आनंदित
सलमान नं पुढं सांगितलं की, ‘प्रेक्षकांकडून कौतुक करून घेणं आणि आमच्या चाहत्यांकडून प्रेम मिळवणं हा आमचा उद्देश आहे. आमच्याकडून प्रेक्षकांना जे हवं आहे, ते त्यांना जेव्हा मिळतं तेव्हा ते आनंदित असतात. त्यामुळेच सिद्धार्थनं जेव्हा सिनेमाचं कथानक ऐकवलं तेव्हा ते ऐकून दमदार वाटलं. मी, शाहरुख यशराज फिल्मसाठी खूप आनंदित आहे. पठाण सिनेमानं जे यश, जो विक्रम रचला आहे तो भारतीय सिनेमासाठी मोठा इतिहास आहे. करोनानंतर प्रेक्षकांनी सिनेमागृहात येणं ही गोष्ट खूप मोठी आणि महत्त्वाची होती.’
पठाणमधून प्रेक्षकांना काही तर चांगला दाखवण्याचा प्रयत्न
शाहरुख खाननं सांगितलं की, ‘मला आणि सलमान कायमच एकत्र काम करण्याची इच्छा होती. परंतु चांगला सिनेमा, दमदार कथानकाची वाट आम्ही बघत होतो. कारण आम्हा दोघांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यामुळे प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करू शकतील असंच काही आम्हाला करायचं होतं. कारण ते आमच्यावर भरभरून प्रेम करत असल्यानं त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे आमचं काम आहे. त्यांना निराश आम्ही करू शकत नाही. तसंच त्यांची निराशा प्रोजेक्टसाठी चांगलं नाही. चाहत्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे स्क्रिप्टचा विचार प्राधान्यानं करणं गरजेचं आहे.’
हे वाचा-राखीचा नवरा आदिल खानला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अभिनेत्रीनेच केलेली तक्रार
शाहरुखनं पुढं सांगितलं की, ‘त्यामुळेच जेव्हा आदीनं त्याच्या यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स, टायगर आणि पठाणनं दोघा सुपरस्टार जासुसांना एकत्र आणण्याचा विचार मांडला. त्यात आण्ही काही धमाकेदार अॅक्शन सीन केले आहेत. त्यामुळे अपेक्षा आहे की, अनेकांनी हा सिनेमा पाहिला आहे. आदीनं जेव्हा सिनेमाचं कथानक सांगितलं तेव्हा मी लगेचच त्याला होकार दिला. त्याचप्रमाणे सलमानला आणि मला मोठ्या पडद्यावर पाहण्याचं वचन पूर्ण केलं आहे. मला आनंद आहे की पठाण सिनमात आम्हा दोघांना एकत्र पाहून प्रेक्षक खूपच आनंदित झाले आहेत.’
शाहरुखनं पुढं सांगितलं की, ‘मला माहिती आहे की प्रेक्षकांना आम्हाला अशा पद्धतीनं पाहण्यासाठी खूप दिवस वाट पहावी लागली आहे. मला आनंद आहे की आम्ही प्रेक्षकांना आवडेल असा सिनेमा केला आणि ते त्याचा आनंद घेत आहेत. त्याशिवाय सेटवर भाईबरोबर काम करताना खूप मजा आली. ज्या पद्धतीनं आम्हाला अपेक्षित होतं तसंच सर्व काही घडलं आहे. त्या प्रसंगातील टायगरचा तो स्कार्फ मी संग्रहात ठेवणार आहे.’