Oneplus ने लाँच केला ६५ इंचाचा Smart TV, कुटुंबासोबत चित्रपट पाहताना मजा येणार दुप्पट

नवी दिल्लीःOnePlus Smart TV : वनप्लसच्या आजच्या क्लाउड 11 इव्हेंट मध्ये कंपनीने अनेक प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. वनप्लसने वनप्लस 11 5G, वनप्लस 11R, वनप्लस बड्स प्रो 2 आणि वनप्लस पॅड सह OnePlus Q2 Pro 65 inch Smart QLED TV ला लाँच केले आहे. वनप्लसचा हा ६५ इंचाचा स्मार्ट टीव्ही संबंधी सर्व काही जाणून घ्या.

स्मार्ट टीव्हीत मिळतील हे फीचर्स
वनप्लसने २०१९ मध्ये वनप्लस Q1 प्रो ला लाँच केले होते. हा टीव्ही ५५ इंचाचा होता. आज कंपनीने OnePlus Q2 Pro 65 inch Smart QLED TV ला लाँच केले आहे. Q2 प्रो मध्ये तुम्हाला खालील भागात एक साउंड बार मिळणार आहे. या स्मार्ट टीव्हीत तुम्हाला dynaudio ट्यून्ड स्पीकर्स मिळतील. हा टीव्ही ६५ इंचाच्या डिस्प्ले सोबत येतो. या टीव्हीत 4K रिझॉल्यूशन सपोर्ट करतो. तसेच या टीव्हीत 120hz चे रिफ्रेश रेट सोबत येतो. कनेक्टिविटीसोबत या स्मार्ट टीव्हीत 4 एचडीएमआय पोर्ट, 3 यूएसबी पोर्ट, 1 हेडफोन पोर्ट दिले आहेत. हा स्मार्ट टीव्ही 3 GB आणि 32 GB च्या स्टोरेज सोबत येतो.

वाचाः OnePlus Pad : वनप्लसने लाँच केला 9510mAh बॅटरीचा पहिला टॅबलेट

OnePlus च्या स्मार्ट टीव्हीची किंमत
वनप्लसचा ६५ इंचाचा Q2 प्रो स्मार्ट टीव्हीची किंमत ९९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा टीव्ही ६ मार्च पासून प्री -ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या टीव्हीची विक्री ल१० मार्च पासून सुरू केली जाणार आहे. या टीव्हीला तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि वनप्लसच्या अधिकृत साइटवरून खरेदी करू शकता.

वाचाः OnePlus 11 5G : वनप्लस 11 5G ची भारतात जोरदार एन्ट्री, पाहा किंमत-फीचर्स

स्मार्ट टीव्हीत अनेक अॅप्स प्रीलोडेड
या स्मार्ट टीव्हीत अनेक अॅप्स प्री लोडेड आहेत. नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ, यूट्यूब, वूट आदी अनेक अॅप्स प्री लोडेड आहेत. टीव्हीत एक सेंटर डॉक स्टँड आणि भिंतीवर लटकवण्यासाठी एक सपोर्टर दिला आहे.

वाचाः OnePlus 11R 5G भारतात लाँच, 100W फास्ट चार्जिंगचा सर्वात स्वस्त फोन

Source link

OnePlus Q2 Pro 65 inch Smart QLED TVOnePlus Q2 Pro 65 inch Smart TVOnePlus q2 pro Smart TVOnePlus Smart TVवनप्लस स्मार्ट टीव्ही
Comments (0)
Add Comment