३०,१२७ कोटी रुपयांना शेअर्स खरेदी करण्यात आले
एलआयसीच्या मते, अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांमध्ये गेल्या काही वर्षांत खरेदी केलेल्या इक्विटी शेअर्सचे एकूण खरेदी मूल्य ३०,१२७ कोटी रुपये आहे. २७ जानेवारी २०२३ रोजी बाजार बंद होईपर्यंत त्यांचे बाजारमूल्य ५६,१४२ कोटी रुपये होते. एलआयसीची एयूएम ४१.६६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. LIC ची अदानी समूहातील गुंतवणूक व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेच्या एक टक्क्यांहून कमी आहे. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
क्लिक करा आणि वाचा- डोंबिवलीत मोठा आवाज झाला, परिसरात पसरला उग्र वास, महानगर गॅसची पाइपलाइन फुटली, हजारो किलो गॅस वाया
नियमानुसारच आहे सर्व गुंतवणूक
कराड म्हणाले की, एलआयसीने देखील पुष्टी केली आहे की त्यांच्या गुंतवणुकीसंबंधी बहुतेक माहिती आधीच सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे. कराड म्हणाले, “एलआयसीने कळवले आहे की त्यांची सर्व गुंतवणूक विमा कायदा, १९३८ आणि IRDAI गुंतवणूक नियमावली, २०१६ च्या वैधानिक चौकटीचे काटेकोर पालन करून केली जाते. तसेच, त्यांना कंपनीच्या प्रशासन प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले जाते.
क्लिक करा आणि वाचा- मला तुझ्या चटईवर झोपायला दे ना…; डोळाही मारायचा, विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला ठोकल्या बेड्या
LIC दीर्घ मुदतीसाठी गुंतवते पैसा
LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार देखील आहे. सर्वात मोठ्या FPI पेक्षाही ती मोठा गुंतवणूकदार आहे. LIC फक्त शेअर बाजारातच नाही तर अनेक गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करते. शेअर बाजारातही एलआयसीचा पैसा केवळ अदानी समूहात गुंतवला जात नाही. एलआयसीच्या इक्विटी एयूएमपैकी ८ टक्के रक्कम अदानी शेअर्समध्ये गुंतवली जाते. एलआयसीच्या गुंतवणुकीबाबत कधीही अल्प मुदतीच्या आधारावर मूल्यपापन करणे गैर आहे. एलआयसी ही दीर्घकालीन गुंतवणूकदार आहे आणि अनेक वर्षांपासून कंपन्यांचे शेअर्स एलआयसीकडे आहेत.
क्लिक करा आणि वाचा- गुड न्यूज! या सरकारी योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक, तुम्हाला दरमहा मिळतील ९००० रुपये