OnePlus Buds Pro 2 भारतात लाँच, प्री-ऑर्डर सुरू, १४ फेब्रुवारीपासून विक्री

नवी दिल्लीःOnePlus Buds Pro 2 : वनप्लस ने आज भारतात एका मोठ्या इव्हेंटचे आयोजन केले होते. या इव्हेंटमध्ये कंपनीने वनप्लस ११, वनप्लस ११ आर, वनप्लस बड्स प्रो २, वनप्लस पॅड आणि वनप्लस स्मार्ट टीव्हीसारखे प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. OnePlus Buds Pro 2 सोबत एक डिव्हाइस बड्स प्रो 2R ला सुद्धा कंपनीने लाँच केले आहे. हे मॉडल खास भारतासाठी तयार करण्यात आले आहे. बड्स प्रो 2 आणि बड्स प्रो 2R संबंधी सविस्तर माहिती जाणून घ्या.

OnePlus Buds Pro 2 ची किंमत आणि प्री-ऑर्डर
OnePlus Buds Pro 2 ची किंमत ११ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला हे प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर आज रात्रीपासून तुम्ही याला प्री ऑर्डर करू शकता. या बड्सची विक्री १४ फेब्रुवारी पासून सुरू केली जाणार आहे.

वाचाः OnePlus 11 5G : वनप्लस 11 5G ची भारतात जोरदार एन्ट्री, पाहा किंमत-फीचर्स

भारतात बड्स प्रो 2R सादर
वनप्लसने भारतात आपल्या बड्सचे एक खास मॉडल सादर केले आहे. देशात वनप्लसने बड्स प्रो 2R व्हर्जन आणले आहे. भारतात या खास मॉडलची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. या खास व्हर्जनला मार्च महिन्यात उपलब्ध करण्यात येणार आहे.

वाचाः OnePlus Pad : वनप्लसने लाँच केला 9510mAh बॅटरीचा पहिला टॅबलेट

OnePlus Buds Pro 2 चे फीचर्स
OnePlus Buds Pro 2 मध्ये एक ११ मिमी डायनामिक ड्रायव्हर आणि एक ६ मिमी प्लानर डायाफ्राम ड्रायव्हर सोबत आणले आहे. बड्स मध्ये अॅक्टिव्ह नॉइस कँसिलेशनसाठी ड्युअल मायक्रोफोन, कॉल नॉइज कँसिलेशनसाठी ट्रिपल मायक्रोफोन आणि बायनॉरल लो-लेटेंसी ब्लूटूथ ट्रांसमिशन दिले आहे. हे बड्स अँड्रॉयड आणइ आयओएस अशा दोन्ही डिव्हाइसला सपोर्ट करणार आहे. बड्स मध्ये वॉटर रेजिस्टेंससाठी IP55 रेटिंग आणि केससाठी IPX4 चे सपोर्ट दिले आहे. ईयरबड्स मध्ये 60mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर ९ तासापर्यंत स्टँडअलोन म्यूझिक ऑफर देते. कॅरी केसमध्ये 520mAh ची बॅटरी मिळू शकते. जी ३९ तासाचा प्लेबॅक सपोर्ट करेल.

वाचाः Oneplus ने लाँच केला ६५ इंचाचा Smart TV, कुटुंबासोबत चित्रपट पाहताना मजा येणार दुप्पट

Source link

OnePlus Buds ProOnePlus Buds Pro 2OnePlus Buds Pro 2 priceOnePlus Buds Pro 2 saleoneplus buds pro featuresOnePlus Buds Pro priceoneplus buds pro price in indiaoneplus buds pro specifications
Comments (0)
Add Comment