मुलींसाठी नाश्ता घ्यायला उतरल्या, चालत्या रेल्वेत चढायला गेल्या पण फलाट अन् रुळामध्ये पडल्या…

नागपूर: प्लॅटफॉर्मवरुन निघालेल्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा दोन मुलींच्या डोळ्या देखत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. गायत्री स्वामीविवेकानंद पांडे असं या ४५ वर्षीय महिलेचं नाव आहे. त्या बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होत्या. तर त्यांचे पती हे बंगळुरुत नोकरी करीता वास्तव्यास आहेत.

बेंगळुरूहून पाटणाकडे जाणाऱ्या गायत्री स्वामीविवेकानंद पांडे या ट्रेन क्रमांक ०६५०९ बंगळुरु दानापूर हमसफर एक्स्प्रेसच्या एसी कोच बी-१ मध्ये त्यांच्या दोन मुलींसह प्रवास करत होत्या. त्या बंगळुरु येथून पतीचा निरोप घेऊन बिहारकडे निघाल्या होत्या. ही गाडी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येऊन थांबली.

पाहा हा व्हिडीओ –

हेही वाचा -चालत्या स्कूल बसमध्ये चालक स्टेअरिंगवर पडला, विद्यार्थिनीने तात्काळ स्टेअरिंग फिरवलं अन् मोठा अनर्थ टळला

ट्रेन थांबल्यानंतर गायत्री पांडे या खाण्यासाठी काही घेण्यासाठी गाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरल्या. त्या येत पर्यंत ट्रेन सुरु झालेली होती. त्या खायचं सामान घेऊन आल्या आणि त्यांनी घाईघाईत बी-६ कोचमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ट्रेनचा वेग वाढलेला होता. त्यांनी दाराचे हँडल पकडले आणि वर चढण्याचा प्रयत्न केला. पण, ट्रेनचा वेग जास्त असल्याने त्यांचे पाय प्लॅटफॉर्म आणि रुळाच्या मध्ये अडकले. त्यामुळे त्या आधी प्लॅटफॉर्मवर आपटल्या आणि मग त्या प्लॅटफॉर्म आणि रुळाच्या मध्ये चिरडल्या गेल्या.

हेही वाचा -मॉलमध्ये चार वर्ष घरासारखा राहिला, कुणाला पत्ताही लागला नाही; एक चूक अन् असा झाला भांडाफोड

हे पाहून प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्यांचा अंगाचा थरकाप उडाला. या भीषण दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना घडल्याचं कळताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. डोळ्यादेखत आईचा मृत्यू झाल्याचं पाहून त्यांच्या दोन्ही मुलींना मानसिक धक्का बसला. यावेळी त्या मुलींचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. त्यानंतर या दोन्ही मुलींना खाली उतरवण्यात आले आणि गायत्री यांचा मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला. तसेच, त्यांच्या पतीला या घटनेची माहिती देण्यात आली.

चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करु नये, अशा सूचना वारंवार रेल्वे स्थानकावर दिल्या जातात. तरीही अनेकदा प्रवासी काहीही विचार न करता चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात आणि मग अशा दुर्घटना घडतात.

हेही वाचा -९ व्या वर्षी पदवी मिळवली, आता ब्लॅक होलचं गूढ उलगडायचंय… लहानग्याची कमाल पाहून भलेभले चकित

Source link

boarding moving traindanapur bangalore humsafar expressmother lost life in train accidentnagpur railway stationwoman fell while boarding running trainwoman lost life in front of daughterswoman lost life in train accidentनागपूर रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यूनागपूर रेल्वे स्थानक
Comments (0)
Add Comment