कसब्याच्या पोटनिवडणुकीचा इतिहास, बापटांनी लढवलेल्या निवडणुकीत ३२ वर्षापूर्वी काय घडलेलं?

पुणे : भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेला जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २६ फेब्रुवारीला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर मैदानात आहेत. या निवडणुकीच्या रूपाने काँग्रेसला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी चालून आहे. तर कसब्यावर पुन्हा एकदा काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्याची देखील संधी आहे.

कसबा विधानसभा मतदार संघात १९९५ पासून भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर २०१९ साली गिरीश बापट खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक या कसब्याच्या आमदार झाल्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक जाहीर झाली असून काँग्रेसला ही पोटनिवडणूक जिंकून इतिहासाची पुरावृत्ती करण्याची संधी चालून आहे

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये LIC चे मोठे नुकसान झाले का? ; सरकारने केला मोठा खुलासा

कसबा विधानसभा मतदार संघात सन १९९१ मध्ये अण्णा जोशी विजयी झाले होते. त्यांना त्यानंतर पुढे खासदारकीची उमेदवारी मिळाली. त्यातही ते विजयी झाले व त्यानंतर कसब्यात पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपने त्यावेळचे नगरसेवक आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी महापौर वसंतराव थोरात उभे होते. मात्र, त्यावेळी भाजपतील ५ नगरसेवक अचानक फुटले व काँग्रेसमध्ये गेले आणि नेमक्या याच कारणाने गिरीश बापट यांचा पराभव झाला व अण्णा थोरात विजयी झाले.

नागपूरच्या मैदानातून गांगुलीने पळ काढला होता अन् तीच पुनरावृत्ती यावेळी द्रविड यांनी टाळली

त्या पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसला अजूनपर्यंत कसब्यात गुलाल उधळण्याची संधी मिळाली नाही. आता भाजपने मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर माजी नगरसेवक हेमंत रसाने यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या समोर रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान आहे. कसब्याची नस ना नस ओळखून असणाऱ्या गिरीश बापट यांना धंगेकर यांनी सलग दोन विधानसभा निवडणुकीत पाळता भुई थोडी केली होती. त्यामानाने धंगेकर यांच्यासमोर रासने यांचा टिकाव लागणे थोडे अवघड दिसत आहे. त्यामुळे जर काँग्रेसमधील सर्वच गटांनी धंगेकर यांचे निवडणुकीत प्रामाणिक काम केले तर काँग्रेसला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या सभेत गोंधळ, डीजे बंद करायला सांगितल्यानं कार्यकर्ते संतापले, गाडी अडवण्याचा प्रयत्न

कसब्यातून जुना शिवसैनिक मैदानात, बापटांना बालेकिल्ल्यातच जेरीस आणणाऱ्या जायंट किलरला तिकीट

Source link

BJP newscongress newshemant rasanekasaba by electionKasaba by Pollkasaba bypollkasaba electionPune newsravindra dhangekar
Comments (0)
Add Comment