‘निर्बंधांबाबत मुंबईला एक आणि पुण्याला वेगळा न्याय का?’

हायलाइट्स:

  • १४ जिल्ह्यांत आजपासून निर्बंध शिथिल
  • ११ जिल्ह्यांत निर्बंध जैसे थे
  • पुण्यातही कठोर निर्बंध

पुणेः करोना संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने २२ जिल्ह्यातील निर्बंध शिथील केले आहेत. तर, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होतेय अशा १४ जिल्ह्यांमध्ये अजूनही कठोर निर्बंध आहेत. यात पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. यावरुन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. निर्बंधांबाबत मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का?, असा सवाल मोहोळ यांनी केला आहे. (pune unlock guidline)

राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत सोमवारी नवी नियमावली जाहीर करताना करोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवले. तर, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांचा निर्णय़ स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सोपवला. तर, २२ जिल्ह्यांमध्ये काही अंशी सूट देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाचाः आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आजपासून ‘हे’ निर्बंध शिथील

पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का?, शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे, असं ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री करोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहोत. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे, असं इशारा मुरलीधर मोहोळ यांनी सरकारला दिला आहे.

पुण्यात व्यापाऱ्यांचे आज आंदोलन

पुणे शहरात व्यापारी महासंघाच्या वतीने वेगवेगळ्या २० ते २१ ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. त्याशिवाय नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर आज मंगळावारी सकाळी साडेअकरा वाजता हॉटेल गुडलक ते ज्ञानेश्वर पादुका चौक दरम्यान मानवी साखळी केली जाणार आहे. तर, गोखले चौकात घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

वाचाः सर्व धार्मिक स्थळे सुरू राहणार की बंद?; सुधारित नियमावली काय सांगते?

कडक निर्बंध कायम असलेले जिल्हे

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर

वाचाः राज्यातील ‘या’ ३ जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन?; आदेशात काय म्हटलंय पाहा…

Source link

maharashtra unlock guidlineMurlidhar Moholpune corona casepune lockdown newspune unlock guidlineपुणे अनलॉकपुणे लॉकडाऊनमहाराष्ट्र अनलॉकमुरलीधर मोहोळ
Comments (0)
Add Comment