UGC: विद्यार्थ्यांना पदवी स्तरावरावर मिळणार पर्यावरण शिक्षणाचे धडे

UGC: विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) अंडरग्रेजुएट स्तरावर पर्यावरण शिक्षणासाठी मसुदा, मार्गदर्शक तत्त्वे आणि अभ्यासक्रम फ्रेमवर्क तयार केला आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण, नैसर्गिक संसाधने, प्रदूषणाची समस्या, पर्यावरण संरक्षणासंबंधी माहिती गोळा करण्यासोबत पर्यावरण वाचवण्याच्या मोहिमेशी तरुणांना जोडणे हा यामागचा उद्देश आहे. यासाठी अभ्यासक्रमाची चौकट तयार करण्यात आली आहे. पर्यावरण शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम पदवी स्तरावर तयार करण्यात आला असून तो सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासावा लागेल.

यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पर्यावरण शिक्षण हा पदवी स्तरावर अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग बनवला जात आहे. सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी संबंधित समस्या जाणून घ्याव्या लागतील आणि त्यांचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल. पंतप्रधानांनी मिशन लाइफ ही जागतिक चळवळ सुरू केली असून ती हवामान बदलाच्या परिणामांपासून आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी देशातील तरुणांचाही महत्त्वाचा वाटा असेल. प्रदूषण, हवामान बदल, इको सिस्टीम यापासून नैसर्गिक संसाधने वाचविण्याच्या दिशेने काम केले जाईल. या उद्देशाने, यूजीसीने ही मसुदा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Education Budget 2023: अधिक शैक्षणिक बजेट, मजबूत डिजिटल शिक्षण आणि कर सवलत; अर्थमंत्र्यांकडून खूप साऱ्या अपेक्षा
परिसंस्था, जैवविविधता, प्रदूषण या समस्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्रदूषणाचे प्रकार कोणते आहेत? आणि त्याला तोंड देण्यासाठी आवश्यक पावले काय आहेत? विद्यार्थी काय भूमिका बजावू शकतात? हवामान बदलाचा आपल्या सर्वांवर कसा परिणाम होत आहे? हे देखील या अभ्यासक्रमात शिकविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील केस स्टडीबद्दलही शिकवले जाणार असून या कोर्समध्ये एकूण चार क्रेडिट्स असणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० मध्ये पर्यावरण शिक्षण हा अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग बनवण्याची शिफारस करण्यात आल्याचे यूजीसी अध्यक्षांनी सांगितले.

UGC New Rule: आता ५ निरक्षरांना शिकवल्यावरच मिळणार डिग्री
पर्यटनस्थळे दत्तक घ्या: ‘यूजीसी’च्या सूचना

Source link

curriculum frameworkenvironmental educationguidelinesUGCपदवी स्तरावर पर्यावरण शिक्षणपर्यावरण अभ्यासक्रमफ्रेमवर्कमार्गदर्शक तत्त्वेयूजीसी
Comments (0)
Add Comment