नालासोपारा पोलीस स्टेशन हादरले, ९ आरोपींना एकत्रच झाल्या उलट्या; समोर आलं थक्क करणारं कारण…

नालासोपारा : नालासोपारा पोलीस ठाण्याच्या लॉकपमध्ये असलेले ९ आरोपी अचानक आजारी पडल्याने खळबळ उडाली आहे. सर्व आरोपींना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहे. या घटनेचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आजारी पडलेल्या सर्वांना वसई- विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही विषबाधा नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा पोलीस तपास करत असल्याची समोर आली आहे. नालासोपारा पोलीस ठण्यात मंगळवारी दुपारीच्या सुमारास लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींना शासनातर्फे देण्यात येणारे जेवण देण्यात आले. काही वेळानंतर यातील एका आरोपीला उलटी झाली व त्यांनतर उर्वरित ८ जणांनाही मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागला.

वीज बिल वसुलीसाठी महावितरणाचे कर्मचारी घरी आल्याचा राग अनावर, पिता-पुत्राने काय केलं पाहा…
लॉकआपमध्ये असलेल्या या आरोपींना मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागल्याने रुग्णवाहिका बोलवून नालासोपारा पोलिसांनी या सर्वांना तात्काळ वसई- विरार महानगरपालिकेच्या सोपारा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व आरोग्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आरोपींनी खाल्लेल्या जेवणाचा नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लॉकअपमध्ये असलेल्या या आरोपींना अचानक विषबाधा कशामुळे झाली याचे कारणही अद्याप स्पष्ट असून तपासणी अहवालानंतरच विषबबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

प्रेम, पळून लग्न आणि मग आई-बाबा होणार तोच घडलं भयंकर; जामिनावर सुटलेल्या तरुणाच्या कृत्याने खळबळ

Source link

mumbai breaking newsmumbai breaking news in marathiMumbai latest newsMumbai news todaynalasopara news todaynalasopara police stationनालासोपारा न्यूज़ मुंबईनालासोपारा स्टेशनमुंबई ब्रेकिंग न्यूज़मुंबई लेटेस्ट न्यूज़
Comments (0)
Add Comment