गिफ्ट मिळविण्याचा नाद तरुणीला महागात पडला… साडेअकरा लाख एका झटक्यात गमावले

पिंपरी : पोलंड देशातून आलेले गिफ्ट मिळवणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. गिफ्ट मिळवण्याच्या नादात तरुणीने ११ लाख ४९ हजार ८० रुपये एका झटक्यात गमावले. कस्टम ड्युटी, हायकोर्ट, मनी लॉन्डरिंग आणि अन्य विविध चार्जेसच्या नावाखाली एका अनोळखी व्यक्तीनी पैसे घेत ही फसवणूक केली आहे. १२ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत ताथवडे येथे हा प्रकार घडला.

या प्रकरणी वाकड पोलिसांनी आकाश सिंग, प्रकाश आणि एक अनोळखी महिला यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाश सिंग नावाच्या व्यक्तीने फिर्यादी असलेल्या तरुणीसोबत इंस्टाग्रामवरून मैत्री केली. विश्वास संपादन करून आकाश याने तरुणीसोबत व्हाट्सअपवर चॅटिंग सुरू केले. त्या तरुणाने मैत्रीचा फायदा घेत तरुणीसाठी पोलंडवरून सोने व हिऱ्याचे ज्वेलरी आणि रोख रक्कम असलेले एक पार्सल पाठवले. ते आपल्या कस्टममधून सोडवून घेण्याचे संबंधित तरुणीला एका महिलेने आणि प्रकाश नावाच्या एका व्यक्तीने फोन करून सांगितले.

त्यानुसार संबधित महिला आणि त्या व्यक्तीने तरुणीकडून पार्सलची कस्टम ड्युटी, हायकोर्ट, मनी लॉण्डरिंग, पोलीस व्हेरिफिकेशन, ट्रान्सफर चार्जेस, इन्शुरन्स, स्टॅम्प चार्जेस एवढ्या चार्जेसच्या नावाखाली ११ लाख ४९ हजार ८० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र पैसे खात्यात घेऊन त्या संबधित तरुणीला पार्सल दिलेच नाही. एवढी मोठी रक्कम देऊनही आपल्याला पार्सल न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यांवरून संबंधित तरुणीने वाकड पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे.

Source link

accusedgirl cheated 11 lakhspimpari newswakad policeआजच्या ब्रेकिंग बातम्यातरुणीची फसवणूकपुणे न्यूजवाकड पोलीस
Comments (0)
Add Comment