बॉलिवूडसाठी मोठा धक्का, सलमान खानच्या चित्रपटाच्या निर्मात्यांचे निधन

मुंबई- बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते नाझिम हसन रिझवी यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आउटलुक इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नाझिम हसन रिझवी आता या जगात नाहीत, त्यांनी सोमवारी रात्री कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक निधून जाण्यामुळे बॉलिवूडला जबर धक्का बसला आहे.

वयाच्या ७० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

चित्रपट निर्माता नाझिम हसन रिझवी यांना आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी उपचारादरम्यान सोमवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. निर्माते यांना कोणता आजार होता, त्यांना कधी आणि कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नाजिम हे उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्यामुळे, त्यांचे अंत्यसंस्कारही तिथेच केले जाणार आहेत.

नाझिम यांनी निर्मिती केलेले चित्रपट

नाजिम हसन रिझवी यांनी सलमान खानच्या ‘चोरी-चोरी चुपके-चुपके’ सारख्या हिट चित्रपटाशिवाय आणखी काही चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘अंडरट्रायल’ (२००७), ‘कसम से कसम’, ‘लादेन आले रे ले’ यांसारखे अनेक चित्रपट नाझिम रिझवी यांनी तयार केले आहेत. नाझिम यांनी आपला मुलगा अझीम रिझवी याला कसम से कसम या चित्रपटातून लॉन्च केले होते, मात्र त्यांच्या मुलाच्या अभिनयाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

Source link

nazim rizvinazim rizvi deathsalman khan nazim rizviनाझिम रिझवीनाझिम रिझवी निधननाझिम हसन रिझवीसलमान खान
Comments (0)
Add Comment