या जोडप्यातील एक जिया पावल यांनी सांगितलं की बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रियेद्वारे बाळाचा जन्म झाला. आई आणि बाळ दोघांचीगी प्रकृती स्वस्थ असल्याचंही त्यांनी सांगितलं. पण. या जोडप्याने बाळाचे लिंग सागण्यास नकार दिला. सध्या ही माहिती सार्वजनिक करू इच्छित नाही, असे त्यांनी सांगितलं.
जाहद आठ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. हे जोडपं केरळमधील कोझिकोड येथे राहत असून ते गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहात आहेत.
स्वप्न पूर्ण झालं
या जोडप्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की ८ फेब्रुवारीला रात्री ९.३७ वाजता आमचं स्वप्न पूर्ण झालं. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आभार. केरळच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी फोनवरुन या जोडप्याचं अभिनंदन केलं.
प्रसूतीसाठी डॉक्टरांचे विशेष पॅनल
जाहदच्या प्रसूतीसाठी डॉक्टरांचे विशेष पॅनल तयार करण्यात आले होते. त्याच्यासाठी वेगळी खोली देण्यात आली होती. जाहद आणि बाळाची प्रकृती चांगली राहिल्यास तीन-चार दिवसांत त्यांना सुट्टी दिली जाऊ शकते. तसेच, या जोडप्याने सांगितले की त्यांच्या बाळाचं लिंग त्यांचं बाळ मोठं झाल्यावर तो स्वत: ठरवेल. त्यांचं लिंग ठरवणारे आम्ही कोण आहोत, असंही ते म्हणाले.