Twitter Blue : भारतात ट्विटरची पेड सब्सक्रिप्शन सर्विस लाँच, ब्लू टिकसाठी मोजावे लागणार ९०० रुपये

नवी दिल्लीः मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर ने अखेर भारतात आपली प्रीमियम सब्सक्रिप्शन सर्विस ब्लूला लाँच केले आहे. भारतात ब्लू टिक घेण्यासाठी आणि प्रीमियम सब्सक्रिप्शन सर्विससाठी यूजर्सला दर महिन्याला ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. कंपनीने ६५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लान प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लान सुद्धा जारी केला आहे. हा प्लान वेब यूजर्ससाठी आहे. कंपनीने ट्विटर ब्लूला गेल्यावर्षी नव्या रुपात जारी केले होते. याआधी अमेरिका, ब्रिटन, कॅनाडा, ऑस्ट्रेलिय, न्यूझीलंड आणि जपानसह काही देशात लाँच केले होते.

भारतात Twitter Blue
कंपनीने आता भारतात आपली प्रीमियम सब्सक्रिप्शन सर्विसला लाँच केले आहे. भारतीय यूजर्सला ट्विटर ब्लूच्या सर्व खास फीचर्सचा लाभ मिळेल. कंपनीच्या माहितीनुसार, मोबाइल म्हणजेच अँड्रॉयड आणि आयओएस दोन्ही ट्विटर ब्लूसाठी दर महिना ९०० रुपये आणि वेब यूजर्सला दर महिना ६५० रुपये द्यावे लागतील. कंपनीचे मालक एलन मस्क यांनी कंपनी खरेदी केल्यानंतर काही दिवसात पेड सब्सक्रिप्शन सर्विस आणण्याची घोषणा केली होती. या सर्विसनंतर मोठी टिका करण्यात आली होती.

वाचाः OnePlus 11 ला टक्कर देण्यासाठी २६ फेब्रुवारीला येतोय Xiaomi 13 Pro

ट्विटर ब्लू यूजर्सला मिळणार ही सुविधा

कंपनीच्या माहितीनुसार, पे करून सब्सक्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सला एडिट ट्विट बटन, 1080p व्हिडिओ अपलोड, रीडर मोड आणि ब्लू टिकची सुविधा मिळेल. कंपनीने आपल्या जुन्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेत बदल केला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, जुन्या ब्लू टिक अकाउंट होल्डर्सला आपल्या ब्लू टिकला बनवण्यासाठी काही महिन्यात सूट दिली जाणार आहे.

वाचाः HP i3 Laptop वर आला सर्वात मोठा डिस्काउंट, थेट २२ हजारांची मिळतेय सूट

आधी या शहरात लाँच झाली होती सर्विस

कंपनीने सर्वात आधी संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडा, यूके, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सह अन्य देशात पेड सब्सक्रिप्शन सर्विसला सुरू केले होते. कंपनीने आपल्या वेबसाइटवर म्हटले होते की, अँड्रॉयड यूजर्स आणि आयओएस यूजर्स ट्विटर ब्लूचे मासिक सब्सक्रिप्शन ११ डॉलर (जवळपास ९०० रुपये) द्यावे लागतील.

वाचाः Twitter Server Down : ट्विटरचे सर्व्हर डाउन, फेसबुक-इंस्टा-यूट्यूबवर लॉगिन करण्यात येतेय ही समस्या

Source link

twitter bluetwitter blue badgetwitter blue subscriptiontwitter blue subscription price in indiatwitter blue ticktwitter blue tick subscriptiontwitter blue ticks
Comments (0)
Add Comment