१६ आठवड्यांचा पगार
ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल त्यांना १६ आठवड्यांचा पगार तसेच आरोग्य-सेवा कव्हरेज इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. करोनानंतर जगभरात बदल होत आहेत. यादरम्यान झूमवर देखील विश्वास दाखविला जात आहे. परंतु जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि अनिश्चिततेचा झूमच्या ग्राहकांवर खोल परिणाम झाला आहे. यामुळेच कंपनीला आपल्या मेहनती आणि हुशार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावे लागले आहे.
करोनाच्या काळात बंपर भरती
झूम हे एक व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे जे त्याच्या व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग टूलसाठी प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. करोनाच्या काळात या प्लॅटफॉर्मची लोकप्रियता आणखी वाढली. कंपनीचे नाव घराघरात पोहोचले. कोरोनाच्या काळात वाढत्या मागणीमुळे झूमने अनेक कर्मचाऱ्यांना कामावर घेतले. मात्र या तुलनेत कंपनीच्या महसुलात वाढ मंदावली.आता जागतिक मंदीच्या काळात जेव्हा जगातील जवळपास सर्वच मोठ्या कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. यात आता झूमनेही आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या आर्थिक वर्षात वेतन कपात
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी कपातीची घोषणा केली. येत्या आर्थिक वर्षात ९८ टक्के वेतन कपात केली जाईल आणि कर्मचाऱ्यांना बोनस देखील मिळणार नाही. अनेक दिग्गज कंपन्यांनी मंदीमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता झुमचे नाव देखील या यादीमध्ये घेतले जाणार आहे.