जिओचा १९९ रुपयाचा प्रीपेड प्लान
रिलायन्स जिओचा १९९ रुपयाचा प्री पेड प्लानमध्ये २३ दिवसाची वैधता ऑफर केली जाते. या प्लानमध्ये रोज या हिशोबाप्रमाणे १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्रमाणे या प्लानमध्ये एकूण ३४.५ जीबी डेटा दिला जातो. सोबत डेली १०० एसएमएसची सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud ची सर्विस फ्री दिली जात आहे.
वाचाः Twitter Server Down : ट्विटरचे सर्व्हर डाउन, फेसबुक-इंस्टा-यूट्यूबवर लॉगिन करण्यात येतेय ही समस्या
एअरटेलचा १९९ रुपयाचा प्री पेड प्लान
भारती एअरटेलच्या १९९ रुपयाच्या प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. हा प्लान ३० दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये Hellotunes आणि Wynk Music चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे.
वाचाः Valentine’s Day : पार्टनरला गिफ्ट करा हे ५ स्वस्त गॅझेट्स, किंमत सांगणे टाळा
एअरटेलचा प्लान का पडतोय भारी
Airtel प्री-पेड प्लान मोठ्या वैधते सोबत येतो. या प्लानध्ये ३० दिवसाची वैधता मिळते. तर जिओच्या प्लानमध्ये २३ दिवसाची वैधता मिळते. जर तुम्हाला डेटा हवा असेल तर तुमच्यासाठी १९९ रुपयाचा प्लान बेस्ट आहे. जर तुम्ही फोनमध्ये ड्युअल सिम अॅक्टिवेट ठेवणार असाल तर तुमच्यासाठी एअरटेलचा १९९ रुपयाचा प्लान बेस्ट आहे.
वाचाः Vodafone-Idea चा शानदार प्लान, अवघ्या १०७ रुपयात मिळतील इतके बेनिफिट्स