मविआ सरकारला अंगावर घेणाऱ्या नेत्याला एकनाथ शिंदेंच्या वाढदिवशी खास गिफ्ट

Maharashtra Politics | मोहित कंबोज यांच्या मालकीच्या सदनिकांमध्ये अनेक अंतर्गत बदल करण्यात आले होते. हे बदल पालिकेने मंजूर केलेल्या आराखड्याला धरुन नव्हते. इमारतीमध्ये पार्किंगच्या जागी मोहित कंबोज यांनी कार्यालय उभारले होते.

 

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • मोहित कंबोज यांच्या घरावर कारवाई होणे अपेक्षित होते
  • सत्ताबदल होताच प्रशासनाच्या भूमिकेत बदल
मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात घरातील अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरुन अडचणीत सापडलेले भाजप नेते मोहित कंबोज यांना मोठा दिलास मिळाला आहे. मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील नेते मानले जातात. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसी याच मोहित कंबोज यांना एक खास गिफ्ट मिळाले आहे. मविआ सरकारच्या काळात मुंबई महानगरपालिकेने मोहित कंबोज यांच्या सांताक्रुझ येथील ‘खुशी बेलमोंडो या इमारतीमधील सदनिकांमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर आक्षेप घेतला होता. पालिकेने त्यांना नोटीसही धाडली होती. यानंतर पालिकेच्या एका पथकाकडून मोहित कंबोज यांच्या घराची मोजणीही करण्यात आली होती. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या घरावर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, सत्ताबदल होताच प्रशासनाच्या भूमिकेत बदल झाला आहे. मोहित कंबोज यांच्या मालकीच्या चार सदनिकांमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मोहित कंबोज महाराष्ट्राचे नवे किरीट सोमय्या झाले आहेत का?
पालिकेच्या नोटीसनंतर मोहित कंबोज यांनी नगरविकास खात्याकडे अपील केले होते. त्यावर निर्णय घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहित कंबोज यांना दिलासा दिला आहे. अपवादात्मक बाब म्हणून मोहित कंबोज यांच्या चार सदनिकांमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर प्रकरणांमध्ये हे प्रकरण उदाहरण मानले जाऊ नये, असेही नगरविकास खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, मोहित कंबोज यांच्यासाठी नियम डावलून अपवादात्मक निर्णय कसा काय घेण्यात आला, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई पोलीस म्हणतात, आमच्याकडे पुरावे नाहीत! भाजप नेते मोहित कंबोज यांना क्लीन चिट

नेमकं प्रकरण काय?

सांताक्रुझच्या एस. व्ही. रस्त्यालगत असलेल्या ‘खुशी बेलमोंडा’ या इमारतीत भाजप नेते मोहित कंबोज यांचेही अलिशान घर आहे.या इमारतीमधील ९ ते १२ हे चार मजले मोहित कंबोज यांच्या मालकीचे आहेत. मोहित कंबोज यांनी या माळ्यांवरील सदनिकांमध्ये पालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यात फेरबदल करुन बांधकाम केल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेने मोहित कंबोज यांना कारणे दाखव नोटीस पाठवली होती, तसेच त्यांच्या सदनिकांमधील अवैध बांधकामाची पाहणीही केली होती. यामध्ये इमारतीमध्ये पार्किंगच्या जागी कार्यालयासाठी खोली बांधण्यात आल्याचे उघड झाले होते. तसेच अन्य सदनिकांमध्येही मंजूर केलेल्या आराखड्यापेक्षा अन्य बदल करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली होती. त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत ठरले होते. परंतु, आता नगरविकास खात्यानेच मोहित कंबोज यांच्या सदनिकांमधील हे अवैध बांधकाम नियमित करण्यास मंजुरी दिली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

CM Eknath ShindeDevendra Fadnavisillegal construction mohit kambojMaharashtra politicsmohit kambojsantacruz khushi belmondoShinde-Fadnavis govtमोहित कंबोज अनधिकृत बांधकाम
Comments (0)
Add Comment