Vodafone-Idea चा शानदार प्लान, अवघ्या १०७ रुपयात मिळतील इतके बेनिफिट्स

नवी दिल्लीः Vi Recharge Plan 2023: सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्या यूजर्सच्या सुविधेसाठी आपले स्वस्त रिचार्ज प्लान ऑफर करीत आहेत. वोडाफोन आयडिया सुद्धा आपल्या यूजर्ससाठी स्वस्त प्लानची सुविधा देत आहे. जर तुम्ही वोडाफोन आयडियाचे यूजर्स असाल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी वोडाफोन आयडियाच्या स्वस्त प्लान संबंधी माहिती देत आहोत. या प्लानमध्ये डेटा आणि टॉकटाइमची सुविधा शिवाय अन्य बेनिफिट्स मिळतात. वोडाफोन आयडियाचा १०७ रुपयाचा स्वस्त प्लानमध्ये तुम्हाला अनेक बेनिफिट्स मिळतात. एकापेक्षा जास्त सिम कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी वोडाफोन आयडियाचा हा प्लान चांगला आहे.

Vi 107 Plan Details
वोडाफोन आयडियाच्या या रिचार्ज प्लानची किंमत १०७ रुपये आहे. या प्लानमध्ये टॉकटाइम १०७ रुपयाचा ऑफर केला जातो. टॉकटाइम शिवाय, या प्लानमध्ये तुम्हाला २०० एमबी डेटा सुद्धा दिला जातो. या प्लानमध्ये डेटा कमी मिळतो कारण, हा एक टॉकटाइम प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला आउटगोइंग मेसेजची सुविधा मिळत नाही. यात तुम्हाला व्हाइस कॉलिंगसाठी २.५ पैसे प्रति सेकंद चार्ज द्यावा लागतो. जर तुम्हाला हा डेटा कमी पडत असेल तर तुम्ही या प्लानमध्ये अन्य डेटा प्लान मर्ज करून याचा फायदा घेवू शकता.

वाचाः Twitter Server Down : ट्विटरचे सर्व्हर डाउन, फेसबुक-इंस्टा-यूट्यूबवर लॉगिन करण्यात येतेय ही समस्या

Airtel 128 Plan Details
एअरटेलच्या स्वस्त प्लानमध्ये यूजर्सला १२८ रुपयाचा प्लान ऑफर करतो. ज्यात ३० दिवासाची वैधता मिळते. हा एक रेट कटर प्लान आहे. यात तुम्हाला लोकल आणि एसटीडी कॉलिंगसाठी २.५ पैसे प्रति सेकंद या हिशोबाप्रमाणे चार्ज द्यावे लागतील. जर तुम्ही नॅशनल व्हिडिओ कॉलिंग्सचा फायदा घेत असाल तर यासाठी तुम्हाला ५ पैसे प्रति सेकंद या हिशोबाप्रमाणे चार्ज द्यावे लागतील. डेटासाठी ५० पैसे प्रति एमबी आणि लोकल एसएमएससाठी १ रुपया चार्ज द्यावा लागेल. एसटीडी कॉलिंगसाठी १.५ रुपये आणि आयएसडी कॉलिंगसाठी ५ रुपये चार्ज द्यावा लागेल.

वाचाः Valentine’s Day : पार्टनरला गिफ्ट करा हे ५ स्वस्त गॅझेट्स, किंमत सांगणे टाळा

वाचाः OnePlus 11 ला टक्कर देण्यासाठी २६ फेब्रुवारीला येतोय Xiaomi 13 Pro

Source link

Airtel 128 PlanAirtel 128 Plan DetailsVi 107 Plan DetailsVi Plan 2023Vi Recharge PlanVi Recharge Plan 2023वोडाफोन आयडिया
Comments (0)
Add Comment