आमदार शहाजीबापूंच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

सोलापूर : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे नाजरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. तेथून परतताना त्यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला एका दुचाकीस्वार वेगाने धडकल्याने त्याचा जाागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आमदार शहाजीबापू पाटील यांनी हजेरी लावली. आमदार शहाजीबापू हे शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत होते. त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस संरक्षक गाडीचा ताफा होता. त्यांचा ताफा माळीवाडी नाजरा येथे आला असता त्याच दरम्यान आमदाराच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस गाडीवर दुचाकी स्वार येऊन धडकला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

पती हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत करत होता व्हॅलेंटाइन वीक साजरा, पत्नीने पकडून बदड बदड बदडले
दरम्यान, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघाता झाल्याचे वृत्त पसरताच घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. आमदार पाटील यांचा ताफा भरधाव वेगाने जात असताना समोरून वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने आमदारांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

गौतम अदानींना सर्वात मोठा झटका; बड्या फ्रेंच कंपनीने ५० अब्ज डॉलर्सचा प्रकल्प थांबवला
अपघातातील जखमीची प्रकृती चिंताजनक

या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमी झालेल्या या दुचाकीस्वराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अदानींच्या या कंपनीला मोठा धक्का! नफा ९६% नी घटला, मात्र शेअर बाजारात घडला चमत्कार

Source link

accidentAccident in shahajibapu patil's convoy :MLA Shahajibapu Patilआमदार शहाजीबापू पाटीलशहाजीबापूंच्या ताफ्यातील गाडीला अपघात
Comments (0)
Add Comment