मुंबई- लोकप्रिय मराठमोळा अभिनेता ओंकार भोजने याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने मोठ्या पडद्यावर झेप घेतली. नुकताच त्याचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील ओंकार आणि इशाच्या जोडीचीही प्रचंड चर्चा आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील ओंकार आणि चित्रपटातील ओंकार यात खूप फरक असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं. ओंकारची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मात्र ओंकारने त्याच्या अभिनयाचा पाया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधूनच रोवला. याच कार्यक्रमातील आणखी एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. या दोन्ही कलाकारांमधील जुगलबंदी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मात्र आता एका कार्यक्रमात ओंकारने आपण फक्त कामासाठी मित्र असल्याचं म्हटलं आहे.
‘माझा होशील ना २’ येणार? विराजस कुलकर्णीने दिली हिंट; फोटो शेअर करत म्हणाला-
‘सरला एक कोटी’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ओंकारने त्यांच्यातील केमिस्ट्रीबद्दल सांगितलं. ओंकार म्हणाला, ‘आम्हा दोघांच्या करिअरची सुरुवात एकांकिकेपासूनच झाली. गौरव माझा सिनिअर आहे. मी एकदा सवाई एकांकिका पाहण्यासाठी गेलो होतो. तिथे गौरवची ‘पडद्याआड’ ही एकांकिका पाहून मी सुन्न झालो. मला त्याचा अभिनय प्रचंड आवडला. दुसऱ्या दिवशी मी गौरवला त्याच नाट्यगृहाबाहेर भेटलो आणि त्याला तुझी एकांकिका छान होती. आपण कधीतरी एकत्र काम करू असं म्हटलं. त्यावर त्यानंही होकार दिलेला. त्यानंतर आम्ही भेटलो ते थेट हास्यजत्रेच्या मंचावर. त्याला ठाऊक होतं की मी एकांकिका करत होतो. मी त्याला त्या दिवसाची आठवण करून दिली.’
ओंकार पुढे म्हणाला, ‘आधीची भेट तेव्हा कामी आली. आम्ही कामाशिवाय मित्र नाही. पण आम्हाला एकमेकांबद्दल द्वेष वाटावा असं काहीच नाही. आम्हाला एकमेकांबद्दल जे वाटतं ते आम्ही कामातून दाखवतो.’ ओंकार आणि गौरव यांची जोडी हास्यजत्रेच्या प्रेक्षकांची आवडती जोडी होती. आजही प्रेक्षक ओंकार आणि गौरव यांच्यावर तितकंच भरभरून प्रेम करतात.
शिवरायांचे दिशादर्शक समर्थ रामदासांवर चित्रपट येणार; हा अभिनेता साकारणार भूमिका
Source link
आम्ही केवळ कामापुरते मित्र पण… हास्यजत्रा फेम गौरव मोरेबद्दल ओंकार भोजने म्हणतो-