थोडा अडखळला पठाण! ५०० कोटींच्या क्लबमध्ये जाणार का शाहरुख, मंदावली कमाई
काही दिवसांपूर्वी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’चे वर्णन ‘घाणेरडा प्रोपगंडा’ चित्रपट म्हणून केले होते, आता अभिनेता प्रकाश राज यांनीही सिनेमावर संताप व्यक्त केला. केरळमध्ये नुकत्याच झालेल्या मातृभूमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ लेटर्समध्ये प्रकाश राज उपस्थित होते. येथे त्यांनी द कश्मीर फाइल्सवर बरीच टीका केली आणि त्याला ‘नॉनसेन्स’ चित्रपट म्हटले.
एक बेधडक अभिनेता म्हणून प्रकाश राज यांची ओळख आहे. राजकीय ते सामाजिक अशा सर्व प्रकारच्या मुद्द्यांवर ते आपले मत निर्भिडपणे मांडत असतात. साऊथशिवाय बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रकाश यांनी ‘द कश्मीर फाइल्स’वर आंतरराष्ट्रीय ज्युरी थुंकल्याचं म्हटलं. या चित्रपटाच्या निर्मात्यांनाही त्यांनी निर्लज्ज म्हटले.
‘ऑस्कर काय भास्करही मिळणार नाही, दोन हजार कोटी रुपये खर्च झाले’
प्रकाश राज म्हणाले, ‘द कश्मीर फाइल्स’ हा सर्वात वाईट आणि निकृष्ट दर्जाचा चित्रपट आहे. त्याची निर्मिती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे. निर्लज्ज आहेत. आंतरराष्ट्रीय ज्युरीही सिनेमावर थुंकतात. मला ऑस्कर का मिळत नाही, असा प्रश्न दिग्दर्शक विचारतोय. पण त्याला ऑस्करच काय भास्करही मिळणार नाही. का ते मी तुम्हाला सांगतो? कारण आपल्याकडे संवेदनशील माध्यमे आहेत आणि तुम्ही इथे प्रोपगंडा फिल्म बनवत आहात. माझ्या सूत्रांनुसार, त्याने असा सिनेमा बनवण्यासाठी २ हजार कोटींची गुंतवणूक केली. पण तुम्ही लोकांना कायम मूर्ख बनवू शकत नाही.
कियारा – सिद्धार्थच्या लग्नात गुरुजींनी किती घेतली दक्षिणा? मीडियाशी बोलताना खरं सांगितलं
‘पठाण’बद्दल केले असे वक्तव्य
प्रकाश राज यांनी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबतही चर्चा केली. प्रकाश राज म्हणाले की, त्यांना या चित्रपटावर बंदी आणायची होती, पण या चित्रपटाने ७०० कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘ते फक्त भुंकतील पण चावणार नाहीत. याने फक्त ध्वनी प्रदूषण होत आहे.’ आता प्रकाश राज यांच्या या विधानावर विवेक अग्निहोत्री काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दरम्यान, जेव्हा नादव लेपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ला प्रोपगंडा फिल्म म्हटले, तेव्हा विवेक यांनी व्हिडिओ बनवून प्रत्युत्तर दिले होते.
‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांसारखे कलाकार दिसले होते. हा चित्रपट ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांनी केलेल्या निर्गमन आणि नरसंहारावर आधारित होता.