या सिनेमाने आतापर्यंत जगभरात ८५० कोटींचा आकडा पार केला आहे. अलीकडेच अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान (केआरके) ने बॉलिवूड बॉयकॉट गँगवर निशाणा साधला. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, आता भक्तांनो रडून काहीही होणार नाही. जे व्हायचे होते ते झाले.
केआरकेने केले ट्वीट
कमाल रशीद खानने ट्वीटमध्ये लिहिले की, ‘बिचाऱ्या भक्तांचं एक वेगळंच दु:ख आहे! पठाण ब्लॉकबस्टर झाला हे मान्य करायलाही ते तयार नाहीत. प्रिय भक्तांनो, आता रडून काहीही होणार नाही. जे व्हायचं होतं ते झाले. आता थोडा वेळ थांबा. जवान चित्रपटाला तशाच प्रकारे विरोध करा आणि नंतर रडा.’ यानंतर केआरकेने आणखी एक ट्वीट केलं.
केआरकेने आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये लिहिलं की, ‘एक चित्रपट पठाण हिट काय झाला ज्यामुळे प्रत्येक बॉलिवूडमधला लुख्खा स्वत:ला प्रतिष्ठीत समजायला लागला. तुम्ही सगळे किती मोठे हुशार आहात हे फेब्रुवारीच्या अखेरीसच स्पष्ट होईल.’ केआरकेच्या ट्वीटवर आता सोशल मीडिया युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले की, ‘केआरके भाऊ, तुझा देशद्रोही पुन्हा एकदा प्रदर्शित कर. बघ तोसुद्धा पठाणसारखा ब्लॉकबस्टर असेल. कारण आजकाल कोणतीही गोष्ट हिट होऊ शकते.’
एका युझरने लिहिले की, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी तू काय करत होतास, सिनेमाचं नाव बदलण्याची तुझीही इच्छा होती, मग त्यावर तू आता का काही बोलत नाहीस? दरम्यान, पठाण सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास भारतात पठाणने आतापर्यंत ४३९.४ कोटींचा आकडा पार केला आहे. हा चित्रपट लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होऊ शकतो.