अडीच वर्षीय ‘सई’च्या मृत्यूने संताप; फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच होणार कारवाई

हायलाइट्स:

  • मलापूर वनपरिक्षेत्रातील हत्ती कॅम्पमध्ये दुःखद घटना
  • ३२ महिन्याचा ‘सई’ नावाच्या हत्तीचा मृत्यू
  • शवविच्छेदनानंतर नुमने फॉरेन्सिक लॅबला पाठवले

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील हत्ती कॅम्पमध्ये आज अत्यंत दुःखद घटना घडली. अवघ्या ३२ महिन्याच्या ‘सई’ नावाच्या हत्तीचा मृत्यू झाल्याने वन विभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या हत्तीचं शवविच्छेदन करण्यात आलं असून फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याचे नमुने पाठवण्यात येणार आहेत. त्या अहवालानंतरच योग्य कारवाई होणार असल्याची माहिती सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार यांनी दिली आहे.

कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये अजित, मंगला, राणी, गणेश, प्रियंका, बसंती, आदित्य, रुपा, अर्जुन आणि सई अशा एकूण दहा हत्तींचा समावेश होता. मात्र २९ जून २०२० रोजी आदित्य या चार वर्षीय हत्तीचा चिखलात अडकल्याने मृत्यू झाला. त्यानंतर पर्यटक आणि वन्य प्रेमींकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी झाली होती. याप्रकरणी नेमकी काय चौकशी झाली, कुणावर कारवाई झाली की नाही, हे प्रश्न अजूनही कायम आहेत.

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा धोका अजून टळलेला नाही; ‘ही’ आहे आजची आकडेवारी

एक वर्षानंतर पुन्हा त्याच हत्ती कॅम्प परिसरात केवळ ३२ महिन्याचा ‘सई’ नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही दुसरी घटना घडल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून येत आहे. अखेर आज दिवसभर वनविभागाने पशुवैद्यकीय डॉक्टरांची चमू शवविच्छेदनासाठी बोलावून मृत हत्तीचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्याची तयारी केली आहे. शवविच्छेदनानंतर हत्ती कॅम्प परिसरात खड्डा खोदून हत्तीवर अंत्यविधी करण्यात आले.

फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच योग्य कारवाई होणार असल्याचे संबंधित अधिकारी सांगत असले तरी २९ जून २०२० ला घडलेल्या घटनेनंतर जर योग्य कारवाई झाली असती तर, पुन्हा एका हत्‍तीचा जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया जनसामान्यांतून येत आहे. त्यामुळे या घटनेचा अहवाल आल्यावर खरंच योग्य कारवाई होईल का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Source link

gadchiroligadchiroli newsगडचिरोलीगडचिरोली न्यूजहत्ती कँम्प
Comments (0)
Add Comment