आज सायंकाळच्या सुमारास जामनेर येथून एस. टी. बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. यादरम्यान पाळधी- नाचनखेडा गावादरम्यान वाघुर नदीच्या पुलावर नाचनखेडाकडे जात असताना एस. टी. बस पलटी झाल्याची घटना घडली. या घटनेत विद्यार्थी आणि प्रवासी जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात एमएच १४ – बीटी २०७७ या क्रमांकाच्या बसचा घडला आहे. अपघाताची घटना नेमकी कशी घडली, याबाबतची माहिती सध्या समोर आलेली नाही.
या बसवर वाहक सैतवाल तर चालक अमोल पाटील हे कार्यरत होते. त्यांनी बसमधून प्रवाशी आणि विद्यार्थी यांना बाहेर काढले. यावेळी पाळधी गावातील कमलाकर पाटील, विश्वजित पाटील, अजय राजपूत, नाना पाटील यांच्यासह परिसरातील लोकांनी बचाव कार्यासाठी सहकार्य केले. अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यास मदतही त्यांनी केली.
या घटनेची माहिती पहूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तर जामनेर डेपोचे मॅनेजर कमलेश धनराळे हे देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.