घरासमोर लावलेली कार घेऊन पळ काढला, पण एक चूक अन् घोळ झाला…

परभणी: घरासमोर लावलेली कार चोरीला गेल्यानंतर जीपीएसच्या सहाय्याने गाडीचा शोध घेण्यात आला. कार चारठाण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंठा, चारठाणा पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. पोलीस मागे लागल्याचे पाहून चोरटे चारठाणा फाटा येथे कार उभी करुन पसार झाले. वेळीच हालचाल केल्याने चोरी होत असलेली कार मिळून आली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

रात्री जाग आली, पाहिलं तर गाडी गायब

या विषयी अधिक माहिती अशी की, मंठा येथील रहिवाशी मुंजाजी काळे हे भाड्याने गाडी लावण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या ताब्यातील एम.एच. ३० ए.झेड. ००७० ही गाडी – आपल्या घरापुढे लावली होती. रात्री ३ वाजेच्या सुमारास उठून पाहिल्यावर त्यांना गाडी दिसून आली नाही. वाहन चोरीला गेल्याची माहिती मंठा पोलिसांना देण्यात आली. जीपीएस यंत्रणा तपासली असता वाहन सदर चारठाण्याच्या दिशेने जात असल्याचे लक्षात आले.

पत्नीचं पार्थिव खांद्यावर घेऊन ३३ किमी चालला, माणुसकीवर प्रश्नचिन्ह, अखेर खाकी वर्दी मदतीला धावली
चोरट्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग, मध्येच गाडी सोडून चोरटे पसार

मंठा पोलीस, गाडी मालक यांनी पाठलाग सुरु केला. चारठाणा पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पिंप्री येथे गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चोरटे थांबले नाही. पोलीस मागे लागल्याची देशमुख, शाम गायके, कानकुन लागल्याने चोरटे चारठाणा फाटा येथील शिवाजी चव्हाण यांच्या घरासमोर गाडी उभी करन पसार पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले.

कुटुंब बाहेर गेलेलं, मुलं झोपडीत खेळत होती, अनाचक आग लागली अन् सख्ख्या भाऊ-बहिणीसह तिघांनी जीव गमावला
ही कारवाई सह पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, देशमुख, शाम गायके, संदिप राठोड, प्रदिप आढाव, कालवणे, वानरे, आचार्य, वाघमारे, राऊत, गरुड, पोलीस मित्र हरी गीते, रामकृष्ण मस्के, प्रभाकर कुम्हे, विजय क्षीरसागर यांनी केली.

Source link

car get backgps in cargps systemParbhaniparbhani crime newspolice get stolen car backstolen car find due to gpsthief steal carपरभणी न्यूज
Comments (0)
Add Comment