आई-बाबा-शुभांगी, माफ करा; मित्रासाठी कर्ज घेतलं, पण त्याने… अंकुशच्या मृत्यूचं गूढ उकललं

अकोला : अवैध सावकारी करणाऱ्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. अंकुश राऊतने चार पानांची सुसाईड नोट लिहित आयुष्य संपवलं होतं. आत्महत्येपूर्वी लिहिलेली ही चिठ्ठी आज उघड झाल्यामुळे अंकुशने चौघा जणांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात काल हा धक्कादायक प्रकार घडला होता. ‘मित्रासाठी कर्ज घेतलं, पण त्यानेही धोका दिला. ज्या व्यक्तीला घर बांधकामाचं कंत्राट दिलं, त्यानेही फसवणूक केली. अजु दादा, विजु दादा.. आई-वडिलांना त्रास देऊ नका, पैसे परत कराल’ असे शेवटचे शब्द लिहित अंकुशने आत्महत्या केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अकोला शहरातील मोठी उमरी भागातील अंकुश नंदकिशोर राऊत हा मंगळवारी दुपारी १ वाजल्यापासून बेपत्ता होता. घरच्यांसह त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी बुधवारी सिद्धार्थ नगरातील एका घरात अंकुशने आत्महत्या केल्याचं समोर आलं.

या दरम्यान अंकुशकडे ‘आई-बाबा-शुभांगी, मला माफ करा’ म्हणणारी चार पानांची सुसाईड नोट निदर्शनास आली (शुभांगी ही अंकुशची लहान बहीण). या प्रकरणी पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत. अंकुशने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये चार जणांच्या नावांचा समावेश आहे, ज्यामध्ये अजय, विजय, मनोज अन् एक महिलेचं नाव आहे.

अजु दादा, विजु दादा.. आई-वडिलांना त्रास देऊ नका

सुसाईड नोटमध्ये (अंकुशने लिहिलेल्या आत्महत्यापूर्वी चिठ्ठीत) नमूद आहे की घर बांधकामसाठी बँकेतून कर्ज काढलं, अन् घर बांधकामाचं कंत्राट हे उमरीतील एका व्यक्तीला दिलं. त्यावेळी त्या ठेकेदाराला ३ लाख ५० हजार रूपये दिले. त्या ठेकेदाराने जुने घर पाडले खरे, पण बांधकाम सुरू केलं नाही. वेळोवेळी म्हणत गेलो, बांधकाम सुरू करा दादा, पण त्याने टाळाटाळ केली. बांधकामासाठी दिलेला पैसा परत मागितला. तरीही ठेकेदाराने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. इतकंच नव्हे तर पैसे देत नाहीये, माझे नातेवाईक राजकारणात तसेच पोलिसातही आहेत, काय करायचं करून घे. अशी धमकी देत होता, असं अंकुशने सुसाईड नोटमध्ये लिहिलंय

त्यानंतर ठेकेदाराच्या लहान भावाने मला थोडे थोडे करून ३७ हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित पैसे दिलेच नाही. अजय दादा, विजय दादा माझ्या घरात खायची सोय नाही हो… घरात गहू नाही… आम्ही रस्त्यावर आलोय. दादा तुम्ही जान ठेवायला पाहिजे. घर बांधकामसाठी दिलेला पैसा परत करा, अशी वेळोवेळी मागणी केली. इतके असताना घर उभं करण्यासाठी आणखी इतर लोकांकडून कर्ज घेतले आणि दुसऱ्या बांधकामाचा ठेका देत बांधकाम सुरू केलं, असंही अंकुशने चिठ्ठीत लिहिलंय.

उजनी जलाशयात मच्छिमाराला बॅग सापडली, उघडून बघताच थरकाप, हातावरचा टॅटू ठरणार महत्त्वाचा
अंकुशने पुढे चिठ्ठीत म्हटलं आहे की माझा मित्र ‘मनोज’ याच्यासाठी उमरीतील एका महिलेकडून दीड लाख रुपयांचं कर्ज घेतले. त्याने कर्जाची परतफेड करण्यास नकार दिलाय. त्यामुळे सावकारी महिलेने माझ्यामागे तगादा लावला. अन् त्या कर्जाचे हप्ते भरत गेलो. कधीकाळी अवैध सावकारी महिलेला व्याजावर घेतलेल्या रक्कमेचा हप्ता वेळेवर न दिला जायचा. त्यामुळे सावकारी महिला सतत घरी येऊन तसेच जिथे तो काम करायचा तिथे येऊन अश्लील शिवीगाळ तसेच मानसिक त्रास द्यायची. दरम्यान काही लोकांनी माझ्याकडून कोरे धनादेश अन् बॉण्ड पेपर लिहून घेतले आहेत. पण ते कोणी लिहून घेतले. यासंदर्भात चिठ्ठीमध्ये नमूद नाही.

बैल अंगावर पडल्याने गुदमरला, मुक्या प्राण्यांना जीव लावणाऱ्या तरुणाची चटका लावणारी एक्झिट
शेवटी अंकुशच्या चिठ्ठी मध्ये म्हटले आहे की आता तरी माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नका अजय दादा, विजय दादा. दिलेला पैसा परत करा, अशी विनंती त्याने केली आहे.

काही रुपयांच्या कर्जापोटी लाखो रुपयांची मागणी

अवैध सावकाराकडून एकाने घेतलेल्या कर्जाचा अंकुश मध्यस्थी ठरला होता. मात्र त्याचा मित्र वेळेत कर्जफेड न करू शकल्यामुळे सावकारी महिलेने अंकुशमागे तगादा लावला होता. काही रुपयांच्या कर्जापोटी लाखो रुपयांची मागणी त्याच्याकडे करण्यात आली होती. या त्रासाला कंटाळून अंकुशने आत्महत्या केल्याचा संशय आहे. याचाही तपास आता पोलीस करणार आहेत.

आईचा टाहो, मुलाचा आक्रोश… पत्रकार शशिकांत वारीसेंचा अपघात नसून घातपात झाल्याचा कुटुंबियांना संशय

Source link

akola crime newsakola man suicideankush raut death mystery solvedankush raut suicideankush raut suicide notemaharashtra crime newsअंकुश राऊत आत्महत्याअकोला तरुण आत्महत्याआत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीचार पानी सुसाईड नोट
Comments (0)
Add Comment