Indian Navy Job: दहावी उत्तीर्णांसाठी नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! ६३ हजार २०० पर्यंत मिळेल पगार

Indian Navy Job: भारतीय नौदलात नोकरीसाठी इच्छुकांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतीय नौदलाने ट्रेडसमन पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. या भरतीद्वारे एकूण २४८ पदे भरली जातील. या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरु शकतात. यासाठी ७ फेब्रुवारी २०२३ पासून ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

शैक्षणिक पात्रता

ट्रेडसमनच्या सर्व पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांनी संबंधित विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा

भारतीय नौदलाच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षांदरम्यान असावी. म्हणजेच उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे.

HPCL Job 2023: पदवीधरांना हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये नोकरी, परीक्षा द्यायची गरज नाही

अर्ज शुल्क

अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २०५ रुपये भरावे लागतील, तर एससी, एसटी, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

पगार

निवड झालेल्या सर्व उमेदवारांना स्तर २ नुसार १९,९०० ते ६३,२०० रुपये दिले जाणार आहे.

६ मार्च २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
Indian Army Job 2023: भारतीय सैन्यात ग्रुप सी पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

Source link

Indian Navy BhartiIndian Navy JobIndian Navy RecruitmentIndian Navy Recruitment 2023Indian Navy Recruitment 2023 NotificationIndian Navy VacancyJobs Junction NewsJobs Junction News in MarathijoinindiannavyLatest Jobs Junction Newssarkari naukri
Comments (0)
Add Comment