मुंबईकरांना अनुभवता येणार पाण्याखालून धावणारी बुलेट ट्रेन; मोठी अपडेट समोर

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील मुंबईतील कामासह पाण्याखालील बुलेट मार्गाला गती देण्यासाठी गुरुवारी निविदा उघडण्यात आल्या आहेत. या बुलेट कामासाठी अफकॉन्स आणि एलअँड टी कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.

बुलेट प्रकल्पाच्या मुंबई विभागात बीकेसी ते शिळफाटा दरम्यान २१ किमीच्या भुयारी मार्ग असून या ७ किमी खाडीखालील बुलेट मार्गाचा समावेश आहे. या बुलेट मार्गासाठी तांत्रिक निविदा सादर करण्यात आल्या असून याची छाननी केल्यानंतर काही महिन्यात आर्थिक निविदा उघडून कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे. दरम्यान खाडीपरिसररातील खारफुटीचे सरंक्षण आणि संवर्धन करून भुयारी बुलेट मार्गाचे काम करण्यात येणार आहे, असा दावा नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने केला आहे.

गुजरात आणि दादरा नगर हवेली मधील बुलेट ट्रेनचे १०० टक्के निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला असून बुलेट मार्ग उभारणीसाठी आवश्यक खांब उभारण्यास सुरुवात झालेली आहे. गुजरातमध्ये १४० किमी लांबीचे खांब तयार झाले आहेत.

मुंबई चकाचक; पंतप्रधानांच्या भेटीसाठी अंधेरी ते सीएसएमटीपर्यंतचा परिसर लख्ख उजळला
राज्यातील बुलेट ट्रेनचे काम विविध टप्प्यात होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल बुलेट ट्रेन टर्मिनसचे ( सी १) आर्थिक निविदा खुल्या झाल्या असून संबंधित कंत्राटदाराच्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. ठाणे, विरार, बोईसर (सी-३) अंतर्गत होणार आहे. १५ मार्चला या निविदा उघडण्यात येणार आहेत. राज्यातील बुलेट आगरासाठी निविदा २२ डिसेंबर २०२२ ला मागवण्यात आल्या असून २६ एप्रिलला या निविदा खुल्या होणार आहे.

PM मोदी आज मुंबईत; वाहतूक मार्गात मोठे बदल, ‘हे’ रस्ते बंद राहणार, पर्यायी मार्ग जाणून घ्या
राज्यात बुलेट ट्रेनचे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे गुजरातप्रमाणे राज्यात देखील वेगाने प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास बुलेट ट्रेन प्रकल्पातील अधिकाऱ्यांना आहे.

Source link

Mumbai Ahmedabad Bullet trainmumbai ahmedabad bullet train projectmumbai-ahmedabad bullet train under seaमुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसमुद्रातून धावणार बुलेट ट्रेन
Comments (0)
Add Comment