Realme GT Neo5 Price
रियलमीच्या या फोनला दोन स्टोरेज सोबत बाजारात उतरवले आहे. एका फोनमध्ये २४० वॉट फास्ट चार्जिंग दिली आहे. तर दुसरा फोन १५० वॉट चार्जिंग सपोर्ट करतो. यात २४० वॉट मॉडलला कंपनीने १६ जीबी रॅम सोबत मार्केट मध्ये उतरवले आहे. फोनचा १५० वॉट मॉडल ८ जीबी रॅम, १२ जीबी रॅम आणि १६ जीबी रॅम सोबत लाँच करण्यात आले आहे.
वाचाः Jio वर भारी हा Airtel रिचार्ज प्लान! १९९ रुपयात फ्री डेटा आणि कॉलिंग
Realme GT Neo5 Specifications
रियलमी जीटी नियो ५ स्मार्टफोन 2772 x 1240 पिक्सल रिझॉल्यूशनचा ६.७४ इंचाचा लार्ज १.५ चा डिस्प्ले सपोर्ट करतो. पंच होल स्टाइलचा हा स्क्रीन अमोलेड पॅनेलवर बनवला आहे. तसेच १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि १५०० हर्ट्ज टच सँम्पलिंग रेट वर काम करतो. या स्क्रीनवर १०० टक्के आहे. ग्राफिक्ससाठी मोबाइल फोन मध्ये एड्रेनो जीपीयू ७३० जीपीयू दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १३ आधारित रियलमी यूआय ४.० आणला आहे.
वाचाः Vodafone-Idea चा शानदार प्लान, अवघ्या १०७ रुपयात मिळतील इतके बेनिफिट्स
फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी निओ ५ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनेलवर एलईडी फ्लॅश दिला आहे. फोनमध्ये 50MP Sony IMX 890 OIS प्रायमरी सेन्सर दिला आहे. ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ४६०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा फोन फक्त ८ मिनिटात फुल चार्ज होतो.
वाचाः Honor x8a स्मार्टफोनची बाजारात एन्ट्री, १०० मेगापिक्सलचा कॅमेरा, पाहा किंमत व फीचर्स