Disney Lay Off: कर्मचार्यांना काढून टाकणार्या कंपन्यांच्या यादीत आता मनोरंजन विश्वातील मोठे नाव म्हणजे डिस्ने सामील झाले आहे. डिस्ने कंपनीने आपल्या ३.६ टक्के म्हणजेच ७ हजार कर्मचार्यांना काढून टाकले आहे. कंपनीने या कपातीमागे व्यवसाय फायद्यात आणण्याचा युक्तिवाद केला आहे. कंपनी आपल्या कामाच्या संरचनेची पुनर्रचना करेल, असे सांगण्यात आले आहे. मागच्या काळात ग्राहक कमी झाल्यामुळे कंपनीला झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
अहवालानुसार, डिस्ने+ हॉटस्टारने ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत ३.८ दशलक्ष सदस्य गमावले. ग्राहकांनी खर्चात कपात केली आहे. हॉटस्टारच्या स्ट्रीमिंग सेवेच्या ग्राहकांमध्ये गेल्या तिमाहीत प्रथमच घट झाली आहे. असे असले तरीही अहवालानुसार, डिस्ने ग्रुपने गेल्या तीन महिन्यांत $ २३.५ अब्ज कमाई केली आहे. हा महसूल अपेक्षेपेक्षा चांगला असला होता, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

डिस्ने हॉटस्टारने कर्मचार्यांना कामावरुन काढल्याबद्दल माहिती दिली. हा निर्णय आमच्यासाठी अजिबात सोपा नव्हता आणि कर्मचार्यांच्या प्रतिभेचा आम्हाला अत्यंत आदर असल्याची प्रतिक्रिया कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी दिली. २०२१ या वार्षिक अहवालानुसार, कंपनीने त्या वर्षाच्या २ ऑक्टोबरपर्यंत जगभरात १ लाख ९० हजार लोकांना रोजगार दिला. त्यापैकी ८० टक्के पूर्णवेळ कर्मचारी होते.