छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फलाट क्रमांक १८ येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळं पूर्व मुक्त मार्ग, पी. डिमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या तिन्ही मार्गावर दुपारी अडीच ते संध्याकाळी साडेचार या कालावधीत वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. या वेळेस सीएसटी जंक्शनवरुन पूर्व मुक्त मार्गाने चेंबुरकडे जाणारी वाहने, डी. एन रोडने सर जे.जे. पुलावरुन, दादर- माटुंगावरुन चेंबुरकरिता पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करतील. चर्चगेट स्थानकावरुन पूर्व मुक्त मार्गाने चेंबुरकडे जाणारी वाहने वीर नरीमन रोडने सीटीओ जंक्शन-हजारी महल सोमानी मार्ग- सीएसटी जंक्शन- सर जे जे उड्डाणपूल- दादर- माटुंगा या मार्गाने जातील.
अंधेरी पूर्वेकडील अल्जामिया तसेच सौफिया, मरोळ कॅम्पस येथे एक सार्वजनिक कार्यक्रम नियोजित आहे. त्यामुळं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायंकाळी साडेचार ते साडेसहा यावेळेत पर्यायी मार्गाचा नापर करावा. अंधेरी घाटकोपर कुर्ला रोड दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक ही साकीनाका जंक्शन येथून मरोळ नाक्याच्या दिशेने येणारी वाहने साकीनाका जंक्शन येथून साकी विहार रोडने मिलिंदनगर, एल. अँड टी. गेट नं ८ येथून डावे वळण घेऊन जे.व्ही.एल.आर रोडने पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे मार्गस्थ होतील. बोहरा कॉलनीकडून मरोळचर्च रोडमार्गे मरोळ मरोशी रोडकडे जाणारी वाहतूक ही स्टार पोल्टी फार्म मरोळचर्च रोड येथे जावे वळण घेऊन अंतर्गंत मरोळ गाव मार्गाने सरळ जाऊन सावला जनरल स्टोअरजवळ डावे वळण घेऊन मरोळ मरोशी रोडकडे मार्गस्थ होतील.
PM मोदी आज मुंबईत; वाहतूक मार्गात मोठे बदल, ‘हे’ रस्ते बंद राहणार, पर्यायी मार्ग जाणून घ्या
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वंदे भारत एक्स्प्रेस व एमएमआरडीएच्या कामांचे लोकार्पण आज मोदींच्या हस्ते होत आहे. पंतप्रधान दौऱ्यावर असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसंच, मुंबईतील काही परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.