यासंदर्भात आलेल्या बातम्यांनुसार गेल्या काही दिवसांपासून प्रभास (Prabhas) ताप येत आहे. अलिकडेच तो रुग्णालयात गेला होता. डॉक्टरांनी त्याला काही दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच प्रभासनं कामातून सुट्टी घेऊन आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभास लवकरच कामावर परत येण्याची अपेक्षा त्याची चाहते व्यक्त करत आहेत.
क्रिती सेनॉनबरोबर साखरपुडा?
दरम्यान, या सर्वांमध्ये क्रिती सेनॉन (Kriti Sanon) प्रभास यांच्या साखरपुड्याची बातमी वाऱ्याचे वेगानं सोशल मीडियावर पसरली आहे. एका फिल्म समीक्षकानं प्रभास आणि क्रिती सेनॉन लवकरच मालदीवमध्ये साखरपुडा करणार असल्याचं ट्विट केलं. त्यानंतर सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्याच्या वेगानं सगळीकडे पसरली आहे. परंतु प्रभासनं ही बातमी निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. तो आणि क्रपिती फक्त एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं म्हटलं आहे.
बातमी म्हणजे निव्वळ अफवा
प्रभासच्या जवळच्या एका सुत्रानं या बातमीचं खंडन केलं आहे. त्यानं असंही सांगितलं की ‘या बातम्यांमध्ये काहीही सच्चेपणे नाही. ही फक्त निव्वळ अफवा आहे. प्रभास आणि क्रिती एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्या दोघांच्या संदर्भात ज्या काही बातम्या आल्या आहेत त्या सपशेल खोट्या आहेत.’ दरम्यान, क्रिती सेनॉनं हिनं देखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, ‘ज्या अफवा आहेत त्या निराधार, बिनबुडाच्या आहेत..’
प्रभासच्या कामाबद्दल सांगायचं तर तो श्रुति हासन याच्याबरोबर प्रशांत नील याच्या ‘सालार’ मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय तो अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दिशा पटणी यांच्याबरोबर नागा अश्विन यांच्या सिनेमात दिसणार आहे. तसंच तो सैफ अली खान, क्रिती सेनॉन यांच्याबरोबर ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झालं आहे. हा सिनेमा जून २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.