मोठ्या वीकेण्डचा पुरेपूर फायदा मिळालेल्या पठाणने सोमवारीही बॉक्स ऑफिसवर आपली पकड सैल होऊ दिली नाही. ‘पठाण’ने सोमवारी म्हणजे विकडेच्या पहिल्या सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमही केला. जे प्राथमिक आकडे समोर आले आहेत ते कोणत्याही ट्रीटपेक्षा कमी नाहीत. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, पहिल्या सोमवारी म्हणजेच सहाव्या दिवशी पठाणने २५ कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे सिनेमाने केवळ सहा दिवसांत हिंदी पट्ट्यात २९४- २९५ कोटींची कमाई केली आहे. तसंच सोमवारच्या कमाईने पुन्हा एकदा नॉन हॉलिडे रेकॉर्ड मोडला आहे.
जगभरातील कमाई ६०० कोटींच्या पुढे
हा सिनेमा जगभरात ब्लॉकबस्टर होण्याच्या मार्गावर आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ने पाच दिवसांत जगभरात ५४२ कोटींची कमाई केली असून आता या सिनेमाने सोमवारी ६०० कोटींचा आकडा गाठल्याचं दिसून येतं. सिनेमाने बॉलिवूड तसेच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि शाहरुख खान यांच्याच सिनेमांचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
‘पठाण’चं बजेट २५० कोटी आहे, यावरुन सिनेमा आधीच सुपरहिट झाला
‘पठाण’चं बजेट २५० कोटी रुपये आहे. फक्त हिंदी पट्ट्यात सिनेमाने सहा दिवसांत २९५.०५ कोटी रुपये कमावले. अशा प्रकारे सिनेमाने त्याच्या खर्चाच्या १८ टक्के जास्त कमाई केली आहे. याआधी हिंदीत सर्वाधिक कमाईचा विक्रम ‘बाहुबली २’ ने केला होता. प्रभासच्या सिनेमाने देशात हिंदी भाषेत ७०८.९९ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘पठाण’चा वेग पाहता शाहरुख खानचा सिनेमा हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. या यादीत ‘पठाण’ने आता रणवीर सिंगच्या ‘सिंबा’ची एकूण कमाई २९५.४५ कोटी सहज पार केले.
‘बाहुबली २’ नंतर आमिर खानचा ‘दंगल’ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ४९५.२५ कोटी रुपयांची कमाई केली. पीके ४४८.७४ कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर, टायगर जिंदा है ४३२.४३ कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर, संजू ४३०.८४ कोटी रुपयांसह पाचव्या क्रमांकावर आहे. सहाव्या क्रमांकावर यशचा ‘KGF 2’ आहे, ज्याने ४२७.४९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.