ChatGPT लिहिणार लव लेटर
जर ChatGPT संबंधी बोलायचे झाल्यास गेल्या काही दिवसांपासून ChatGPT ची खूप चर्चा होत आहे. परंतु, यात भारतीय सर्वात पुढे आहेत. व्हॅलेंटाइन डे जवळ आला आहे. या काळात भारतीय टेक्नोलॉजीच्या मदतीने सर्वात जास्त लव लेटर लिहित आहेत. याचा खुलासा McAfee च्या मॉडर्न लव रिसर्च रिपोर्टमधून करण्यात आला आहे.
वाचाः Vodafone-Idea चा शानदार प्लान, अवघ्या १०७ रुपयात मिळतील इतके बेनिफिट्स
लव लेटर लिहिण्यात भारतीय सर्वात पुढे
रिपोर्टच्या माहितीनुसार, ६२ टक्के भारतीय अडल्ट या व्हॅलेंटाइन डेवर आपल्या लव लेटरला लिहिण्यासाठी एआय चा वापर करीत आहे. जे बाकीच्या देशाच्या तुलनेत जास्त आहे. सर्व्हे रिपोर्टनुसार, ७३ टक्के लोक डेटिंग प्रोफाइलमध्ये AI चा वापर करीत आहेत.
वाचाः PhonePe : फोनपे यूजर्ससाठी गुड न्यूज, आता देशाबाहेर करता येणार UPI पेमेंट
काय आहे ChatGPT चे उत्तर
सर्व्हेत विचारण्यात आले की, लव लेटर लिहिण्यासाठी AI बेस्ड ChatGPT सारख्या टूलचा वापर का वाढत आहे. तर ५९ टक्के उत्तर होते की, याने लव लेटर लिहिण्यात कॉन्फिडेन्स बिल्डअप होतो. तर ३२ टक्के म्हणणे आहे की, लव लेटर लिहिण्यात जास्त वेळ लागत नाही. तर २६ टक्के म्हणणे होते की, क्रिएटिविटी पद्धतीने लव लेटर लिहिले जावू शकते. ज्या वेळी सर्व्हेत विचारले की, जर समोरच्या व्यक्तीला कळले की, लव लेटर एआय मशीन टूलने लिहिले आहे. ५७ टक्के उत्तर दिले की, त्यांना वाइट वाटेल की, लव लेटर एआय मशीनने लिहिले आहे.
वाचाः डिजिटल क्रांती! ChatGPT, Bard आणि Ernie; कोण आहे भारी, पाहा