होलिका दहनाची तिथी
शास्त्रानुसार होलिका दहन हे पौर्णिमेला भद्रा काळ वगळून करावे. विशेष स्थितीत भद्रा मुख आणि भद्रापुच्छ सोडून होलिका दहन करता येते. पण यासोबत प्रदोष काळात ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्याच दिवशी होलिका दहन करावे, अशीही मान्यता आहे. अशा स्थितीत निर्माण होणाऱ्या परिस्थितीनुसार पंजाब, महाराष्ट्र, जम्मू, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ६ मार्च रोजी प्रदोष कालावधीत पौर्णिमा आहे. अशा परिस्थितीत या राज्यांमध्ये ६ मार्चला होलिका दहन केले जाऊ शकते.
पूर्व भारतात,७ मार्च रोजी प्रदोष काळात पौर्णिमा तिथी असेल. आणि या दिवशी भद्रा सुद्धा नसेल. म्हणूनच होलिका दहन ७ मार्चला करणे उत्तम. यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहणार नाही. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये ७ मार्चला होलिका दहन आणि ८ मार्चला रंगोत्सव साजरा केला जाईल. आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, जिथे ७ मार्चला सूर्यास्त ६.१० मिनिटांच्या आधी होईल, तिथे ७ मार्चला होलिका दहन होईल.
पौर्णिमा तिथी प्रारंभ – ६ मार्च सोमवार, सायं ४ वाजून १८ मिनिटे ते
पौर्णिमा तिथी समाप्ती – ७ मार्च मंगळवार, सायं ६ वाजून १० मिनिटे
भद्रा काळ प्रारंभ – ६ मार्च सोमवार, सायं ४ वाजून ४८ मिनिटे ते
भद्रा काळ समाप्ती – ७ मार्च मंगळवार, सकाळी ५ वाजून १४ मिनिटे
होलाष्टक २०२३
होलिका दहनाच्या ८ दिवस आधी होलाष्टक सुरू होते, जो अशुभ काळ मानला जातो. पंचांग गणनेनुसार होलाष्टक सोमवार, २७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि ८ मार्च, बुधवारपर्यंत वैध असेल. धार्मिक मान्यतांनुसार होळाष्टकादरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, त्यामागे अनेक सामाजिक श्रद्धा आहेत. ज्यामध्ये होलिका दहनाची घटना हे महत्त्वाचे कारण मानले जाते.
पौराणिक कथा
आख्यायिकेनुसार राजा हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून होलिका प्रल्हादासोबत आठ दिवस अग्नीत बसली होती, पण नवव्या दिवशी प्रल्हाद वाचला आणि होलिकेचे दहन झाले तेव्हा विष्णू भक्तांनी रंगोत्सव साजरा केला. त्यामुळे आठ दिवस अशुभ मानले जातात. या घटनेनंतरच होळाष्टक साजरे केले जात असल्याचे मानले जाते.