प्रिय व्यक्तीला प्रॉमिस करायचंय? तर होईल ‘या’ शुभेच्छा संदेशाचा उपयोग, वाचा आणि पाठवा

प्रेम करणे जितके सोपे आहे तितकेच ते निभावणे कठीण. त्यामुळे प्रपोज केल्यानंतर आयुष्यभर हे नातं जपण्यासाठी वचन देण्याचा दिवस म्हणजे प्रॉमीस डे. आयुष्यभराची साथ निभावण्याचे वचन एकमेकांना देत सुखी संसाराची स्वप्नं या दिवशी सजवली जातात. अनेकांची स्वप्नं इथपासूनच सुरू होतात. तेव्हा टेडी डे नंतर प्रॉमीस डे साजरा करायला सज्ज व्हा आणि स्वत:शी असो वा आपल्या आवडत्या जवळच्या व्यक्तीला एक प्रॉमीस नक्की करा. प्रॉमीस करायला शब्द कमी पडताय तर या शूभेच्छा संदेशाचा होईल उपयोग. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

हॅपी प्रॉमिस डे

“तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,

प्रत्येक वेळी येचे तुझी आठवण,
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
हेच प्रॉमिस करूया एकमेकांना आपण
हॅपी प्रॉमिस डे”

“एक प्रॉमिस माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत
साथ मात्र तुलाच देईल.
हॅपी प्रॉमिस डे २०२३”

प्रॉमिस डेच्या शुभेच्छा

“माझी मैत्रीण, माझं सर्वस्व, माझी बायको

हे सर्व काही एकाच व्यक्तीत मी पाहतो
आणि ती तू आहेस.
मी हे कायम जपण्याचा प्रयत्न करेन
हॅपी प्रॉमिस डे”

“वचन दे आयुष्यभरासाठी की तु सदैव माझ्यापाशी राहशील
कोणत्याही सुख-दुखात तु साथ माझी देशील
कधीही आयुष्यात मागे पडलो तरीही तुच मला समजून घेशील
हॅपी प्रॉमिस डे २०२३”

Happy Promise Day

“आजन्म साथ देशील असे वचन दे मला,

नेहमीच पदोपदी खुश ठेवीन मी तुला
सोडून कधी जाऊ नकोस तु मला,
मी आयुष्यभर साथ देईन तुला
हॅपी प्रॉमिस डे”

“चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील प्रेमाचा पारवा
या चांदण्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा…
वचन दे आपल्यात कधीही न येवो दुरावा
Happy Promise Day”

प्रॉमिस डेच्या खूप खूप शुभेच्छा

“आपल्या स्वप्नांच्या पुर्ततेसाठी

आपल्या कुटूंबासाठी नी वैवाहिक जीवनासाठ,
आपल्या मित्र मैत्रिणींसाठी
आपल्या गुरुजनांसाठी
आपल्या भोवताली असलेल्या प्रत्येकासाठी
स्वत:शीच करा एक प्रॉमिस आपल्या माणुसकीसाठी”

“तुमचा मानसन्मान करेल,
तुम्हाला आजन्म सांभाळेल,
करा हे एक प्रॉमिस
तुमच्या आई वडिलांना नी जोडीदाराला
करा हे एक प्रॉमिस
तुमची जबाबदारी आहे त्या प्रत्येक व्यक्तीला
हॅपी प्रॉमीस डे २०२३”

Source link

happy promise Day 2023happy promise Day 2023 quotes in marathihappy promise Day 2023 Statushappy promise Day 2023 wisheshappy promise Day 2023 wishes in Marathiप्रॉमिसप्रॉमिस डेव्हॅलेंटाइन विक
Comments (0)
Add Comment