उसाचा गाळप हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस कारखान्यावर पोहोचवला जात आहे. मात्र ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.
आयन एलएलपी साखर कारखाना येथे ऊस घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या अपघात झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही आहे. मात्र अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
क्षमतेपेक्षा अधिक ऊस असल्याने वाहन चालकाचा ताबा सुटला आणि तापी नदीवरील पुलाचे कठडे तोडून ट्रॅक्टचा पुढचा भाग नदीपात्राच्या दिशेने उभा राहिला आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे असे अपघात दिवसागणित वाढत चालले आहेत, मात्र संबंधित आरटीओ विभाग याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे, मात्र एखादी मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का असा देखील प्रश्न आता नागरिकांकडून केला जात आहे.
वंदे भारत एक्सप्रेस देशाला समर्पित करताना अत्यानंद होतोय, पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात