रत्नाकर गुट्टे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढून जिंकली आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार, रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडच्या संचालकांपैकी एक आहेत. युको बँकेच्या नेतृत्वाखालील बँक संघटनांकडून २००८ आणि २०१५ च्या दरम्यान गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडने मुदत कर्ज, वर्किंग कॅपिटल सुविधा आणि इतर क्रेडिट सुविधांच्या रुपात ५७७.१६ कोटी रुपयांच्या विविध कर्ज सेवा घेतल्याचा आरोप असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले
सीबीआयने नुकतीच नागपुरात दोन, तर परभणीत तीन ठिकाणी गुट्टे आणि इतर आरोपींच्या घरांची झडती घेतली. गुट्टे यांच्या मुलांवर आणि कुटुंबातील इतर सदस्यांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रत्नाकर गुट्टे आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड यांच्याविरुद्ध कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. बँकेने तक्रारीत केलेला आरोप आता सीबीआयच्या एफआयआरचा भाग आहे.
कंपनीसाठी रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला, व्यवसायात नुकसान झाले आणि शेवटी बँकांना थकबाकी न भरल्याने कंपनीचे खाते नॉन-परफॉर्मिंग अॅसेट बनले. कंपनीने २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीत साखरेच्या खरेदी-विक्रीसाठी पुरवठादारांच्या नावे युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाकडून लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) उघडले, ज्याची रक्कम १९७.१७ कोटी रुपये इतकी होती, असा बँकेचा आरोप आहे. एलसी अंतर्गत माल नाकारण्यात आला आणि १४३.८७ कोटी रुपयांचा खरेदी परतावा म्हणून दाखवण्यात आला, असा दावाही बँकेतर्फे करण्यात आला आहे.
कांदे विक्रेता रिअल हिरो; दुकान झाडताना मिळालेलं सात ते आठ लाखांचं सोनं ग्राहकाला परत केलं