तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिर परिसरामध्ये सुरक्षा रक्षक आकाश शित्रे आणि रेस्क्यू कर्मचारी गवळी ऋषीकेष यांना गणेश विहार येथे एक अनोळखी पिशवी सापडली होती. त्या पिशवीत संबधीत व्यक्तीचे आधार कार्ड सापडले. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेले वारकरी संप्रदाय केशर भाऊसाहेब कोठे या महिला भाविक राहणार हंडाळवाडी पाथर्डी अहमदनगर येथील असून सदरील पिशवी दर्शनमंडप कंट्रोल रुम येथे जमा केली.
तसेच, वारकरी संप्रदाय महिला भाविक केशर भाऊसाहेब कोठे राहणार हंडाळवाडी पाथर्डी अहमदनगर पिशवीमध्ये एक आधार कार्ड आणि एसटी महामंडळाचा पास होता. तसेच, त्या पिशवीत एकूण २९ हजार ३७३ रुपये होते. त्या भाविकांची ओळख पटवून त्या महिला भाविकाला रक्कम परत करण्यात आली.
अकाश शित्रे समक्ष सुरक्षा निरिक्षक कमलाकर ऋषीकेश गवळी यांच्या प्रमाणिक पणामुळे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे. सुरक्षा निरिक्षक बाळू बागल, सुरक्षा रक्षक पवार शित्रे आकाश, देवकर कृष्णा, जाधव विकास, ऋषीकेश गवळी इत्यादी उपस्थित होते.