एक नारळ तयार होण्यासाठी कित्येक महिन्यांचा काळ लागतो. याबद्दल जसं खोबरं तयार होतं त्याप्रमाणे नैसर्गिक रित्या पाणी देखील तयार होते. या पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम असे अनेक घटक असतात. डॉक्टर देखील रुग्ण आजारी असताना नारळ पाणी पिण्याचा सल्ला यामुळे रुग्णांची शारीरिक ताकद वाढवणे, शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवणे, वजन कमी करणे असे अनेक फायदे मिळतात. हे मौल्यवान पाणी अनेक ठिकाणी वाया जाताना दिसत असते. विशेषतः मंदिरामध्ये आणि हेच पाणी वाचवण्यासाठी कोल्हापूरच्या शासकीय तंत्रनिकेतन येथे गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असलेले दत्तात्रय सुतार यांनी नारळपाणी संकलन मशीन बनवले आहे. विशेष म्हणजे ही मशीन केवळ पाच हजार रुपयांमध्ये त्यांनी तयार केले आहे.
कोणत्याही ठिकाणी ठेवता येऊ शकेल असे हे साधारणतः २ फूट उंचीचे मशीन आहे. वरच्या बाजूला नारळ वाढवण्यासाठी एक स्टीलचे बफिंग केलेला अँगल बसवण्यात आलेला आहे. त्याखाली एक ट्रे बसलवला आहे, ज्यामध्ये फोडलेल्या नारळाचे पाणी एकत्र संकलित होईल. या ट्रेला चारही कोपऱ्यांना होल करून त्यातून हे पाणी खाली ठेवण्यात आलेल्या बाटलीमध्ये साठवले जाते.हे नारळपाणी संकलन यंत्र सुतार यांनी एक प्राथमिक स्वरूपातील यंत्र म्हणून बनवले आहे. जर हे नारळ पाणी संकलन मशीन प्रत्येक मंदिरात वापरले गेले तर याद्वारे पाणी गोळा करून गरीब रुग्णांना किंवा तहानलेल्या देता येईल सोबतच परिसरातील स्वच्छ्ता ही राखले जाईल, असे सुतार यांचे म्हणणे आहे.