पुढच्या ५ वर्षांचे करिअर प्लानिंग
तुमचा करिअर प्लॅन, ग्रोथ प्लॅन काहीही असू शकते पण प्रत्येक गोष्ट काळासोबत बदलते. जर तुम्हाला मुलाखतीत विचारले गेले की तुम्ही पुढील ५ किंवा १० वर्षात स्वत:ला कुठे पाहता? तर तुम्हाला तुमचे खरे स्वप्न सांगण्याची गरज नाही. पुढच्या ५ वर्षांत मी स्वतःला या कंपनीत किंवा सेक्टरमध्ये चांगल्या पदावर काम करताना पाहतोय असे म्हणता येईल.
आधीची नोकरी का सोडताय?
हा मुलाखतीत विचारला जाणारा सर्वात सामान्य प्रश्न आहे. एचआरपासून तुमच्या भावी रिपोर्टिंग मॅनेजरपर्यंत, प्रत्येकजण तुम्हाला हा प्रश्न नक्कीच विचारतील. तुम्ही जुन्या नोकरीमुळे नाराज आहात किंवा पगारासाठी नवीन नोकरी शोधत आहात, यापैकी कोणते तुमचे कारण असले तरी असे सांगू नका. तुम्हाला नवीन आव्हानांसोबत काम करायचे आहे, असे उत्तर देखील देऊ शकता.
आधीच्या बॉसबद्दल वाईट सांगू शकता का?
मुलाखतीत तुमच्या सध्याच्या कंपनीच्या बॉसबद्दल वाईट बोलणे टाळा. मुलाखत पॅनेलमध्ये उपस्थित असलेले लोक तुम्हाला आधीच ओळखत असतील किंवा तुमच्या स्थितीची कल्पना असेल तर ती वेगळी बाब आहे. पण तरीही, सध्याच्या कंपनीच्या बॉस, कर्मचारी किंवा वर्क कल्चरबद्दल वाइट सांगू नका. अन्यथा नवीन कंपनीतील बॉस तुम्हाला नोकरी देताना विचार करेल.
तुमचा छंद कोणता आहे?
प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद नक्कीच असतो पण नोकरीच्या मुलाखतीदरम्यान तुमचा छंद कोणता हा प्रश्न देखील हमखास विचारतात. तुम्हाला रात्रंदिवस चित्रपट किंवा वेब सिरीज पाहण्याची आवड असेल किंवा तुम्हाला सोशल मीडियाचे व्यसन असेल तर तुम्हाला ही गोष्ट मुलाखतीत सांगण्याची गरज नाही. यामध्ये समोरची व्यक्ती तुम्हाला आळशी समजू शकते. याऐवजी तुमच्या कामासंबंधीत गोष्टींपैकी आवडीची गोष्ट सांगू शकता.