या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी शितल जानवे खराडे उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई, पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर मेढा पोलीस ठाणे यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या.
पोलीस निरीक्षक अरुणा देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र तपास पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळाजवळील व आजूबाजूच्या परिसरात विचारपूस तसेच सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता फुटेजमध्ये त्यावेळी पिवळ्या व काळया रंगाचे जर्किन परिधान केलेले दोन संशयीत व्यक्ती आढळून आले.
त्यानुसार तपास पथके गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या तपास पथकास संशयीत हे मेढा शहरात आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मृत राम बाबू पवार हे दोघांपैकी एकाच्या वडिलांना जुन्या भांडणाच्या कारणावरून त्रास देत असल्याने त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली असल्याचं सांगितलं. या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.