अमूल डेअरीनेही महिन्याच्या सुरुवातीलाच दूधाच्या दरात तीन रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर गोवर्धननेही २ रुपयांनी वाढ केली होती. ऑपरेशन आणि मिल्क प्रोडक्शन कॉस्टमध्ये वाढ झाल्याने दूधाच्या किंमतीत वाढ केल्याचं गोवर्धन कंपनीने म्हटलं होतं.
अर्धा लीटरच्या दोन दूध पिशव्यांची किंमत आधी ७० रुपये होती. मात्र, दर वाढवल्यानंतर ती ७२ रुपये इतकी असेल. ग्राहक मोठ्या प्रमाणात वापरत असलेल्या पाच लीटरच्या पॅकेजच्या किंमत ३६० रुपये इतकी असेल. गोकुळने गायीच्या दुधाचे दर ५४ वरुन ५६ रुपये केले आहेत. तर टोन्ड दूध ५२ रुपयांवरुन ५४ रुपयांवर पोहोचले आहे. तर स्पेशल दुधाची किंमतीत चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
पुणे- मुंबईत गोकुळचे दर एकसारखेच आहेतपण कोल्हापुरात गोकुळचे दूध इतर शहरांच्या तुलनेत २ ते ६ रुपयांनी स्वस्त दरात उपलब्ध होतेय. गोकुळ महाराष्ट्रात दररोज १४ लाख लिटर दुधाची विक्री करते.