कॉलेजमधून घरी जायला निघाला; पण नियतीच्या मनात होते दुसरेच, तरुणासोबत वाटेतच घडलं भयंकर

बुलढाणाः आज अनेक विद्यार्थी दुचाकीचा महाविद्यालय आणि शाळेमध्ये जाण्याकरीता वापर करत असतात. कमी वेळामध्ये ग्रामीण भागातून मुख्यतः शहरी भागाकडे जाण्याकरिता दुचाकी सोयीची पडते. मात्र, अनेकदा अपघाताच्या घटनाही घडतात. बुलढाणा जिल्ह्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. (Buldhana Accident News)

बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील बस स्टॉप समोर झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसरा विद्यार्थी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. करण पांडुरंग खडसे हा छगनराव भुजबळ कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी वय वर्ष २१ राहणार हिवरा आश्रम त्याची दुचाकी क्रमांक एम एच २१ बी एल ५९३५ ने १० फेब्रुवारी रोजी दुपारी आपल्या घराकडे जात असताना त्याची गाडी स्लीप झाली. त्यावेळी चिखलीकडून भरधाव वेगाने येत असलेल्या टेम्पो क्रमांक एमपी ६८ जी ०५५८ ने धडक देऊन. त्याला गंभीर जखमी केले. त्याच अवस्थेत त्याला प्रथम मेहकर व नंतर औरंगाबाद येथे नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.

कुटुंबात २१ वर्षांनी पाळणा हलणार होता, पण एका घटनेने आनंदावर पडलं विरजण, गर्भवती महिला…
तर दुसरा विद्यार्थी विवेकानंद विद्यामंदिर वर्ग दहावी मध्ये शिकत असलेला शुभम संतोष गिरी हा शाळा सुटल्यानंतर सायकलने घरी जात असताना याच टेम्पोने त्याला देखील कट मारला. या अपघातात तो खाली कोसळून त्याच्या तोंडाला जबर मार लागला असून त्याच्यावर हिवरा आश्रम येथे उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत पावलेल्या करण खडसे यांच्या मृत्यूने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या मार्गावरील भरधाव वाहनांचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला असून. हिवरा आश्रम येथे चार ते पाच ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी जोर धरत आहे. चिखली मेहकर रस्ता जेव्हापासून चांगला झाला तेव्हापासून या मार्गावर वाहनांचा वेग वाढला आहे. हिवरा आश्रम गावातील रस्त्यावरूनही जाताना वाहने वेग कमी करत नाही. अशा प्रकारातून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

केसांच्या वेणीने केला घात; महिला शेतकऱ्यासोबत घडलं असं काही की वाचून अंगाचा थरकाप उडेल

Source link

20 years old died in accidentbuldhana accident newsbuldhana accident news in marathibuldhana news todayबुलढाणा अपघात बातम्याबुलढाणा आजच्या बातम्या
Comments (0)
Add Comment