BOI Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

BOI Job 2022: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या ५०० पदांची भरती केली आहे. त्यासाठी ११ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बॅंक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in वर ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात.

या पदभरती अंतर्गत सामान्य बँकिंग स्ट्रीममध्ये क्रेडिट ऑफिसरची ३५० पदे आणि स्पेशलिस्ट स्ट्रीममधील आयटी अधिकारीची १५० पदे भरली जाणार आहेत. JMGS-I मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बँकिंग आणि फायनान्स (PGDBF) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा. सामान्य / ईडब्ल्यूएस/ ओबीसी उमेदवारांना ८५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांना १७५ अर्ज शुल्क भरावे लागेल.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

Indian Army Job 2023: भारतीय सैन्यात ग्रुप सी पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

२५ फेब्रुवारी २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, जीडी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाइन परीक्षा, वैयक्तिक मुलाखत आणि गटचर्चेत मिळवलेल्या गुणांवर आधारित असेल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
HPCL Job 2023: पदवीधरांना हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये नोकरी, परीक्षा द्यायची गरज नाही

Source link

bank jobs 2023bank latest jobs newsbank of indiaboi jobboi recruitmentboi recruitment 2023exam newsJob Newspo vacancyRecruitment 2023
Comments (0)
Add Comment