वसंत मोरे यांचे ट्वीट काय?
“आज सकाळी जिमला चाललो होतो. अचानक समोर ३ महिला भगिनी हातात कोयता घेऊन दिसल्या. मनात आले की इतके आमचे पुणे असुरक्षित झाले का, की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या? मी थोडा त्यांच्या मागे गेलो, तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या. पण असं वाटण्यामागे कारण असं की मागील आठवड्यात आमच्या कात्रज गावठाणमध्ये सकाळी ६ वाजता भर रस्त्यावर एका महिलेचे मंगळसूत्र चोरून चोर रस्त्याने चक्क पळत गेला. जर पोलिसांनी कडक कारवाई नाही केली, तर मग असे चित्र दिसले तर नवल वाटून घेऊ नये.” असे ट्वीट वसंत मोरे यांनी केले आहे.
‘पहिली गोष्ट तर ही की हा कोयता नाही तर विळा आहे’ अशी कमेंट एकाने केली आहे, तर दुसऱ्याने ‘कोयता नाही खूरपे आहे’ असे म्हटले आहे. कोणी त्यावर ‘मुद्दा हा नाही की, कोयता आहे विळा आहे, की खुरपे आहे, हे महत्वाचे नसून त्या हत्याराद्वारे एखाद्याला शारीरिक हानी पोहचवली जाऊ शकते का? हे महत्वाचे. उगाच अर्थाचा अनर्थ’ याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
एकाने ‘कामाला जात आहेत … काही पण लॉजिक का??’, तर दुसऱ्याने ‘त्या मनपा बागेतील गवत कपणाऱ्या स्त्रिया आहेत’ असं सांगून ‘विषय क्लोज’ करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाने तर ‘तात्या ही पोस्ट जरा अती झाली’ असंच म्हटलंय.
‘कोयता हा आमच्या सारक्या शेतकारी लोकांचे दैनंदिन वापरातील गोष्ट होती. विचु काटे पासून बचाव करीत.. संध्याकाळी घरी परतेच्या वाटेवरी चारा न्यायचा मात्र काही दिवसांपासून ह्याचा दुरुपयोग होत आहे ही चिंतेची बाब..तलवार जी आपली घरा घरात शान होती तीचे ही असेच नाहीसे अस्तित्व झाले..’ अशी कमेंट एका महिलेने केली आहे.