आत्महत्येचा इशारा देणारा पोलिस कर्मचारी सापडला बेशुद्धावस्थेत; पोलिस दलात खळबळ

हायलाइट्स:

  • मनाविरुद्धच्या ठिकाणी बदली झाल्याने आत्महत्येचा इशारा
  • बेशुद्धावस्थेत सापडला पोलिस कर्मचारी
  • सातारा पोलिस दलात खळबळ

सातारा : मनाविरुद्धच्या ठिकाणी बदली झाल्याने आत्महत्येचा इशारा देणारे पोलिस कर्मचारी माळी हे आज दुपारी यवतेश्वर येथे बेशुद्धावस्थेत सापडले आहेत. माळी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

साताऱ्याहून म्हसवड पोलिस ठाण्यात बदली होत असल्याने पोलिस कर्मचारी माळी यांनी आज सकाळीच व्हिडिओच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला होता. वैद्यकीय आणि घरगुती कारणांमुळे माळी यांना म्हसवड येथे बदली नको होती. याबाबत त्यांनी पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांच्याशीही चर्चा केली. मात्र, त्यांची मागणी अमान्य झाल्यामुळे माळी यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता.

Zika Virus In Maharashtra: महाराष्ट्राला ‘झिका’चा किती धोका?; केंद्राचे पथक तातडीने पुण्यात दाखल

आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर दुपारी सदर पोलिस कर्मचारी यवतेश्वर येथे बेशुद्धावस्थेत सापडल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली. माळी यांना सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची सातारा जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत असून सदर पोलिस कर्मचाऱ्याची प्रकृती सुधारल्यानंतर या प्रकरणी आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Source link

sataraSatara policeसातारासातारा न्यूजसातारा पोलिस
Comments (0)
Add Comment