तांबे-थोरात विरुद्ध पटोले वादाचे नाशकात पडसाद; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र

नाशिक : सत्यजीत तांबे-बाळासाहेब थोरात विरुद्ध नाना पटोले या वादानंतर नाशिकमध्ये काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचं थोरातांच्या राजीनाम्यानंतर समोर आले आहे. नाना पटोले यांची हायकमांडकडे तक्रार केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. दरम्यान नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे समोर येत आहे.

पेठ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला आहे. तालुका अध्यक्ष यांच्यासह १२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबे यांना प्रदेश कॉंग्रेसकडून जी वागणूक मिळाली त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

पेठ तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष यांनी पत्राद्वारे हे सुचित केले आहे. पेठ तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस, आदिवासी सेल काँग्रेस, सहकार सेल काँग्रेस, शहर काँग्रेस आणि एन. एस. यू. आयचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पत्राद्वारे ‘तालुकाध्यक्ष निवडीबाबत नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा कुठलाही प्रोटोकॉल न पाळल्याने तसेच नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबे यांना प्रदेश काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिल्याने निषेध व्यक्त केला आहे.

महाविजय २०२४, भाजपचा संकल्प, फडणवीसांच्या विश्वासू मोहऱ्यावर निवडणुकांची जबाबदारी
त्यासोबतच सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्षाच्या आजी माजी सर्व पदांचे आणि सदस्यत्वाचे सामूहिक राजीनामे देत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. यावर विशाल जनार्दन जाधव (तालुका अध्यक्ष, पेठ काँग्रेस कमिटी), संदीप चंद्रकांत भोये (तालुका अध्यक्ष, युवक काँग्रेस पेठ), हरिदास रामदास भुसारे (तालुकाध्यक्ष, आदिवासी सेल काँग्रेस) ललित माधव मानभाव (एनएसयुआय अध्यक्ष) कुमार सिताराम भोंडवे (तालुकाध्यक्ष, सहकार सेल काँग्रेस पेठ तालुका) रेखा भारत भोये (तालुकाध्यक्ष, पेठ तालुका युवती काँग्रेस) रुक्मिणी प्रकाश गाडर (महिला शहराध्यक्षा, पेठ शहर काँग्रेस कमिटी) गीता विशाल जाधव (सरपंच, ग्रामपंचायत आसरबारी) विकास काशिनाथ सातपुते (सरचिटणीस, पेठ तालुका युवक काँग्रेस) राहुल लक्ष्मण चौधरी (उपाध्यक्ष, पेठ तालुका युवक काँग्रेस) दिनेश देवराम भोये (सरचिटणीस, पेठ तालुका काँग्रेस कमिटी) कैलास दगडू गाडर ( तालुकाध्यक्ष, आदिवासी सेल काँग्रेस पेठ) या सर्वांच्या सह्या आहेत.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी अशोक चव्हाणांना महत्त्वाची जबाबदारी, पटोलेंनाही संधी
नाशिकच्या पेठ तालुक्यात हे तालुका अध्यक्ष यांच्यासह १२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याचे परिणाम स्थानिक पातळीवर दिसू लागले आहेत.

बाळासाहेब थोरातांचा विधी मंडळ नेतेपदाचा राजीनामा; सत्यजीत तांबे म्हणतात, मला याबाबत माहित नाही !

Source link

Balasaheb Thoratbalasaheb thorat vs nana patoleMaharashtra Political NewsNana Patolenashik congress leaders resignsatyajeet tambeनाना पटोलेनाशिक काँग्रेस पदाधिकारी राजीनामाबाळासाहेब थोरातसत्यजीत तांबे
Comments (0)
Add Comment