VIDEO: बदलापूर एमआयडीसीत भीषण आग, संपूर्ण केमिकल कंपनी जळून खाक, काही कामगार जखमी

बदलापूर : बदलापूर एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. बदलापूर, अंबरनाथ एमआयडीसी, अंबरनाथ पालिका, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि तळोजा एमआयडीसीमधील अग्निशामक दलाच्या गाड्या ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून ते ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या आगीत दोन कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे.

बदलापूर एमआयडीसी मधील गगनगिरी फार्मा केमिकल नावाची कंपनीत ही आग लागली आहे. गगनगिरी फार्मा केमिकल कंपनीमध्ये विविध प्रकारचे फार्मा इंडस्ट्रीसाठी लागणारे केमिकल तयार करण्याचे काम केले जात होते. दरम्यान, आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास अचानक या कंपनीमध्ये आग लागली. या कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्यामुळे काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले.

ट्रेनमध्ये प्रवासी महिला झोपली होती, चोरट्याने साधला डाव, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
बदलापूर पालिकेची अग्निशमन यंत्रणा समोरच असल्याने बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कारखान्यात अत्यंत ज्वलनशील रसायन असल्यामुळे ही आग क्षणार्धात वाढली आणि संपूर्ण कंपनी या आगीच्या विळख्यात सापडली. यामुळे ही भीषण आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील कामगारांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील कामगारांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या आगीच्या घटनेत दोन कामगार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अरे त्या सुधीर तांबेंना घ्या पुढे; शरद पवार यांच्या एका वाक्याने राजकारणात वेगळीच चर्चा
आगीत जखमी कामगार रुग्णालयात दाखल

सध्या कुलिंगचे काम चालू असून सदर आगीमध्ये कंपनीतील एक कामगार भाजल्याने त्यात इस्पितळात दाखल केले आहे. तसेच ज्यावेळी कंपनीत आग लागली तेव्हा तेव्हा एकच घबराट पसरली. यावेळी आपला जीव वाचविण्यासाठी कामगार सैरावैरा धावू लागले. यात ३ कामगारांनी उडया मारल्याने त्यांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Times Litfest: भारतीय साहित्य आणि अध्यात्म हे एकमेकांपासून वेगळे नाहीत… टाइम्स ग्रुपचे व्हीसी आणि एमडी समीर जैन यांनी सादर केले संत कबीरांचे दोहे

Source link

fireFire in Badlapur MIDCsome workers injured in fireकेमिकल कंपनीत आगबदलापूर एमआयडीसीत आग
Comments (0)
Add Comment